Home धुळे धककादायक! अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार, १३ जणांवर गुन्हा

धककादायक! अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार, १३ जणांवर गुन्हा

Dhule Rape Case: मुलीला पळवून नेत तिच्यावर बलात्कार केला तसेच अत्याचाराचे मोबाईलवर चित्रीकरण करून व्हायरल केले. त्याचबरोबर खंडणीची मागणी.

Dhule minor Girl kidnap and rape

धुळे: घरी सोडण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर बलात्कार केला तसेच अत्याचाराचे मोबाईलवर चित्रीकरण करून व्हायरल केले. त्याचबरोबर खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक घटना चिपलीपाडा ता. साक्री येथून समोर आली आहे.

या प्रकरणी पाच महिन्यानंतर संशयित तरुणासह सहकार्य करणाऱ्या त्याचे आई-वडील व मित्र अशा एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आई आहे.  

याबाबत चिपलीपाडा (ता. साक्री) येथे राहणाऱ्या पीडित १७ वर्षीय मुलीने साक्री पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार १० मार्च २०२२ ला सायंकाळी दहिवेल येथून ती घरी जात होती. त्यावेळी धनराज दिलीप पवार (रा. मावचीपाडा ता. साक्री) व रोहित (रा. पिंजारझाडी ता. साक्री) या दोघांनी तुला कॉलेजवरून घरी सोडतो, असे सांगून दुचाकीवर बसविले.

त्यानंतर जांभोरा गाव शिवारातील जंगलात नेले. तेथे धनराज याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. रोहितने लक्ष ठेवत त्याला सहकार्य केले. तसेच दीपक सन्या बागूल याने त्यांच्या मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रीकरण केले.

हे चित्रीकरण त्याच्यासह त्यांच्या इतर सात ते आठ मित्रांनी सोशल मिडीयावर व्हायरल केले. त्यानंतर संबंधित मुलीकडे १५ हजार रुपये खंडणीचीही मागणी केली. तसेच धनराज यास त्यांच्या आई- वडिलांनी लपवून ठेवण्यासाठी सहकार्य केले.

त्यामुळे धनराज पवार, रोहित, धनराजचे वडील व आई, दीपक सन्या बागूल (रा. बाभुळदे ता. साक्री) व त्याच्या सात ते आठ मित्रांवर बलात्कारासह अपहरण, खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  पोलिस निरीक्षक अजयकुमार चव्हाण अधिक तपास करीत आहेत. पोलिसांनी संशयित दीपक बागूल यास अटक केली आहे.

Web Title: Dhule minor Girl kidnap and rape

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here