Home अहमदनगर आरोपीने न्यायालयाच्या आवारात स्वतःवरच केला वार

आरोपीने न्यायालयाच्या आवारात स्वतःवरच केला वार

Ahmednagar: न्यायालयाच्या आवारात स्वत: च्या हातावर धारदार हत्याराने वार.

Ahmednagar accused stabbed himself on the court premises

नगर:  खूनाचा प्रयत्न गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याने न्यायालयाच्या आवारात स्वत: च्या हातावर धारदार हत्याराने वार केले. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.

कल्याण नारायण भिस्ते (रा. नवनागापूर) असे या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. भिस्ते याच्याविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो पसार होता. त्याच्याविरूध्द न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते. एमआयडीसी पोलिसांनी त्याला मंगळवारी ताब्यात घेत बुधवारी दुपारनंतर न्यायालयात हजर केले. तेथे हा प्रकार घडला. दरम्यान, आरोपीने हा प्रकार कोणत्या कारणातून केला याबाबत माहिती समोर आलेली नाही.

Web Title: Ahmednagar accused stabbed himself on the court premises

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here