Ahmednagar Fraud Crime: एका व्यावसायिकाची सुमारे १४ लाख ४३ हजार रूपयांची फसवणूक.
नगर: लोन अॅपद्वारे सावेडी उपनगरातील एका व्यावसायिकाची सुमारे १४ लाख ४३ हजार रूपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधीत व्यावसायिकाने येथील सायबर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीने फेसबुकवर डिसेंबर २०२१ मध्ये मोबाईल लोन अॅपद्वारे झटपट कर्ज मिळवा, अशी जाहिरात पाहिली होती. त्या जाहिरातीनुसार त्यांनी मोबाईल अॅप डाऊनलोड करून त्याद्वारे कर्ज घेतले होते. ते कर्ज ऑनलाईन फेडूनही त्यांना पैशासाठी तगादा लावण्यात आला. फिर्यादीने विविध लिंकच्या माध्यमातून १४ लाख ४३ हजार ३६ रूपये रक्कम देवूनही त्यांच्याकडे पैशासाठी तगादा लावण्यात आला. पैसे भरले नाही तर फिर्यादी व त्याच्या कुटूंबियांचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याच्या धमक्या देण्यात आल्या. शिवीगाळ करण्यात आली. या सर्व त्रासाला कंटाळून सदर व्यावसायिकाने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, लोन अॅपच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.
Web Tile: Fourteen and a half lakh fraud through loan app