Home अहमदनगर Accident: म्हशीच्या धडकेत अपघातात दुचाकीस्वार ठार

Accident: म्हशीच्या धडकेत अपघातात दुचाकीस्वार ठार

Ahmednagar Accident: म्हशीच्या धडकेत त्याच्या डोक्याला मार लागला, संशयास्पद मृत्यूची चौकशी अधिकाऱ्यांमार्फत झाली पाहिजे.

Bike rider killed in an accident after being hit by a buffalo

नगर: दुचाकीला म्हशींची धडक बसून झालेल्या अपघातात तरूणाचा मृत्यू झाला. विवेक विक्रम गायकवाड (वय २६ रा. निलक्रांती चौक) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मुलगा विवेकचा मृत्यू संशयास्पद मृत्यूची चौकशी अधिकाऱ्यांमार्फत झाली पाहिजे, अशी मागणी मयत युवकाच्या आईने केली आहे.

मंगळवारी सायंकाळी विवेक हा दुचाकीवरून मिस्कीन मळा येथून जात असताना म्हशीच्या धडकेत त्याच्या डोक्याला मार लागला. त्याला एका रिक्षा चालकाने खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे त्याला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. बुधवारी सकाळी विवेकचा मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला असता नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी तोफखाना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जे. सी. मुजावर, सहाय्यक निरीक्षक नितीन रणदिवे, पोलिस अंमलदार महेश विधाते, बाबासाहेब गुंजाळ, मरकड यांनी भेट दिली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मुजावर करीत आहेत.

दरम्यान, तरूणाच्या मृत्यूबाबत त्याच्या नातेवाईकांनी शंका उपस्थित केली आहे. त्याची आई भारती गायकवाड यांनी पोलिसांना निवेदन दिले आहे. मुलगा विवेकचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने या मृत्यूची चौकशी अधिकाऱ्यांमार्फत झाली पाहिजे. विवेकच्या मृत्यूचे काही साक्षीदार असून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी म्हशी मागे असलेल्या मुलांवर संशय व्यक्त केला आहे.

Web Title: Bike rider killed in an accident after being hit by a buffalo

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here