धक्कादायक घटना! प्रेयसीची खांडोळी करून मुंडके, हात गेला प्रियकर घेऊन
औरंगाबादेतील धक्कादायक घटना | Murder: धारदार हत्याराने गळा, हात धडावेगळे . अन् शेजाऱ्याने करीत ते अवयव घेऊन गेला.
औरंगाबाद: औरंगाबाद अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या विवाहित प्रेयसीचा विवाहित प्रियकराने १४ ऑगस्ट रोजी सकाळी गळा आवळून खून केला. १६ ऑगस्ट रोजी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घरी येऊन धारदार हत्याराने गळा, हात धडावेगळे ….अन् शेजाऱ्याने करीत ते अवयव घेऊन गेला. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास चारचाकी गाडी घेऊन येत त्यात उर्वरित राहिलेले मृतदेहाचे तुकडे गोणीत भरून घेऊन गेला. हा धक्कादायक प्रकार एन १५, नवजीवन कॉलनी, हडको येथे बुधवारी दुपारी उघडकीस आला. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा रात्री उशिरा नोंदविण्यात आला.
सौरभ बंडोपंत लाखे (३५, रा. शिऊर, ता. वैजापूर) असे या आरोपीचे नाव आहे. अंकिता महेश श्रीवास्तव (२४, रा. शिऊर, ता. वैजापूर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. उपलब्ध माहितीनुसार सौरभ विवाहित असून, त्याला एक मुलगी आहे. त्याचे वडील शिक्षक आणि पोलिसांना दिली. आई अंगणवाडी शिक्षिका म्हणून निवृत्त झाले आहेत. त्याचे शिऊर गावात फर्निचरचे दुकान आहे, तर अंकिता ही मूळची जालना येथील असून, तिचा विवाह साडेचार वर्षापूर्वी शिऊर येथील व्यावसायिक महेश यांच्याशी झाला होता. दोघांना एक साडेतीन वर्षांची मुलगी आहे. अंकिता आणि सौरभ या दोघांचे घर समोरासमोर आहे. त्यातून दोघांत काही वर्षांपूर्वी अनैतिक संबंध निर्माण झाले. या संबंधातूनच १४ डिसेंबर २०२० रोजी अंकिता पळून गेली. त्यावेळी मिसिंगची नोंद शिऊर ठाण्यात पतीने केली. यानंतर १२ मार्च २०२२ रोजी अंकिताच्या पतीने पुन्हा ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. यावर अंकितानेच शिऊर पोलिसांना आपण स्वतःहून पतीपासून विभक्त राहत असल्याचे सांगितले. यानंतर ती औरंगाबादेतील नवजीवन कॉलनी येथील प्रवीण सुतार यांचे घर भाड्याने घेऊन राहत होती. सौरभ तिच्यासोबतच होता. त्याचे नियमित येणे-जाणे होते. शेजाऱ्यांना अंकिता १५ ऑगस्ट रोजी सकाळी एकदाच दिसली. त्यानंतर दिसलीच नाही. सौरभने १५ ऑगस्ट रोजी सकाळीच गळा आवळून तिचा खून केला. यानंतर घराला कुलूप लावून निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी धारदार हत्यार सोबत आणले. त्या हत्याराने अंकिताचे मुंडके, हात धडावेगळे केले. दोन्ही अवयव एका पिशवीत भरून घेऊन त्याने शिऊर येथील त्याच्या फर्निचरच्या गोडावूनमध्ये ठेवले. बुधवारी खोलीतून दुर्गंधी सुटली. यानंतर या खुनाला वाचा फुटली.
मालकाला कळवले अंकिताच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरू महिलेने तीन दिवसांत अनेकवेळा फोन केला. मात्र अंकिताचा फोन सौरभ उचलत होता. तो तिच्याशी बोलणेही करून देत नव्हता. बुधवारी सकाळी अंकिताच्या रूमच्या खिडकीजवळ प्रचंड वास येऊन माशा घोंघावत होत्या. ही माहिती भाडेकरु महिलेने घरमालक प्रवीण सुतार यांना कळविली. तसेच एकजण चारचाकी गाडीत अंकिताच्या रूममधून गोणी घेऊन गेला. त्याचा प्रचंड वास येत असल्याचेही सांगितले. त्याचवेळी समोरच्या दुकानदाराने चारचाकी गाडीचा नंबर लिहून ठेवला. मालक सुतार आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
Web Title: Murder Case Beloved’s shoulders and heads, hands gone with the lover