अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस सक्त मजुरी
Ahmednagar Rape Case: अल्पवयीन मुलीला शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार (Sexually Abuse).
अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर आत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांनी आरोपी अमोल बाबासाहेब गिते (वय २३, रा. वाळुंज ता. पाथर्डी) यास सक्त मजूरी तसेच दहा रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीला शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. सदर घटना १ ऑगस्ट २०२० मध्ये घडली होती.
पाथर्डी तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी 1 ऑगस्ट 2020 रोजी रात्री शेतात नैसर्गिक विधीसाठी गेली होती. त्यावेळेस आरोपी अमोल बाबासाहेब गिते याने पीडित अल्पवयीन मुलीच्या तोंडात रूमाल घालून अत्याचार केला होता. त्यानंतर पीडिताने वडील व चुलते यांना सदर घटनेची माहिती दिली. त्यांनी 5 ऑगस्ट 2020 रोजी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अमोल गिते विरोधात अत्याचार तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात आत्याचाराचा गुन्हा दाखल होता. पोलीसांनी तपास करत आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. त्यावर न्यायालयाने आरोपीस सक्त मजूरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अॅड. मंगेश व्ही. दिवाणे यांनी काम पाहिले.
Web Title: Sexually Abuse of a minor girl, forced labor for the accused