Home संगमनेर संगमनेर तालुक्यात दुचाकीवरून रस्त्यावर पडल्याने एकाचा मृत्यू

संगमनेर तालुक्यात दुचाकीवरून रस्त्यावर पडल्याने एकाचा मृत्यू

Dies after falling on the road in Sangamner taluka

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे एक जण दुचाकीवरून खाली उतरत असताना भटक्या जनावरांचा धक्का लागून डांबरी रस्त्यावर पडल्याची घटना घडली आहे. यामध्ये त्याचा डोक्याला मार लागून मृत्यू झाला आहे.

या अपघातात जयराम गणपत दिघे वय ५५ रा. तळेगाव दिघे असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारस घडली. तळेगाव दिघे येथील जयराम दिघे हे व्यक्तीच्या दुचाकीवरून कोपरगाव रस्त्याने गावाकडे येत असताना जुनेगावाच्या छत्रपती संभाजी चौक येथे ते दुचाकीवरून खाली उतरत असताना गावात फिरणाऱ्या बेवारस जनावरांचा धक्का लागून डांबरी रस्त्यावर पडल्याने डोक्याला जबर मार लागला गेला. त्यानंतर त्यांना संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचाराअगोदरच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत्यू घोषित केले. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Dies after falling on the road in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here