Home अकोले निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात आज पाणी सोडले

निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात आज पाणी सोडले

Water was released from Nilwande dam 

अकोले | Nilwande Dam : शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातील गावाकरीता जलसंपदा विभागाने निळवंडे धरणातून पाणी सोडले. या धरणातून १ हजार २०० कुसेकणे विसर्ग सोडण्यात आला आहे.

प्रवरा नदीपात्र बऱ्याच ठिकाणी कोरडे झाले होते तर अनेक ठिकाणी डबक्यातील पाणी खराब झाले होते. तसेच लाभक्षेत्राच्या गावांमधून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडावे अशी मागणी करण्यात येत होत होती. त्यामुळे जलसंपदा विभागाने निर्णय घेत आज सकाळी निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.

निळवंडे धरणातील पाणीसाठा हा ८ हजार २८५ दशलक्ष घनफूट होता. हे आवर्तन साधारणपाने चार दिवस चालणार आहे. यामध्ये ४०० ते ४५० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर होणार असल्याची माहिती शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली आहे.

Web Title: Water was released from Nilwande dam 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here