Home अहमदनगर Rape: घरात घुसून अपंग तरुणीवर गळा दाबून अत्याचार

Rape: घरात घुसून अपंग तरुणीवर गळा दाबून अत्याचार

Ahmednagar Rape Case: अपंग तरुणीवर अत्याचार (abuse) , गर्भवती असल्याने आले समोर.

the disabled girl was Rape by entering the house and strangling her

अहमदनगर:  घरात घुसून तरूणाने अपंग युवतीवर गळा दाबून अत्याचार (sexual abuse) केल्याची घटना समोर आली आहे. पीडिता गर्भवती असल्याचे डॉक्टरांच्या तपासणीतून समोर आले. यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात तरुणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश मनोहर गंगावणे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील एका गावातील ही घटना असून कोतवाली पोलिसांनी सदरचा गुन्हा तपासकामी कर्जत पोलिसांकडे वर्ग केला आहे. सुमारे चार ते साडेचार महिन्यांपूर्वी फिर्यादी युवती घरामध्ये एकटीच असताना गंगावणे याने तिच्या घरामध्ये प्रवेश केला. युवतीला घराच्या स्वयंपाक खोलीत बळजबरीने घेऊन जात गळा दाबून अत्याचार केला. सदरची घटना कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

सदर घटनेनंतर पीडिताने सुमारे चार ते साडेचार महिन्यांनंतर नातेवाईकांना माहिती दिली. तिची प्राथमिक तपासणी कर्जत येथील रुग्णालयात करण्यात आली. पीडिता गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर पुढील वैद्यकीय तपासणी नगर शहरातील खासगी रुग्णालयात करण्यात आली. तेथील डॉक्टरांनी गुन्हा दाखल करण्याचे सांगितले. यानंतर सदरचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल होऊन तो कर्जत पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Web Title: the disabled girl was Rape by entering the house and strangling her

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here