Home अहमदनगर पारनेर ढगफुटीसदृश पाऊस, शेकडो एकर शेतीही गेली वाहून, ओढ्याचे पात्र तलावासारखे

पारनेर ढगफुटीसदृश पाऊस, शेकडो एकर शेतीही गेली वाहून, ओढ्याचे पात्र तलावासारखे

Ahmednagar | Parner  News: ढगफुटीसदृश पाऊस (cloud burst) : पारनेर तालुक्यातील अळकुटी, शेरी कासारे, रांधे, गारखिंडी येथील चित्र.

Parner rain like cloud burst, hundreds of acres of agriculture were washed away

पारनेर: ओढ्याचे पात्र तलावासारखे झाले. त्यात तलावासारखे पाणी चारही बाजूंनी फिरले आणि फक्त पिकेही नाही तर आमची शेतीही वाहून गेली. माती, दगडाने विहिरी गाडल्या गेल्या अशी भीषणता पारनेर तालुक्यातील रांधे, शेरी कासारे, गारखिंडी, अळकुटी येथील शेतकरी सांगत होते, यावेळी त्यांच्या डोळ्यांतून अश्रूही अनावर झाले

पारनेर तालुक्यातील शेरी कासारे, गारखिंडी, रांधे, अळकुटी भागात रविवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. रात्री ओढ्याचे तळे होऊन सांगितले. पाहत होतो, मात्र सकाळी उठून पाहिले तर पिके तर राहिलीच नाही. शेतीही वाहून गेल्याची भीषणता गारखिंडीचे शेतकरी संजय चौधरी, केशव चौधरी, ज्ञानदेव चौधरी, अण्णा चौधरी, एकनाथ चौधरी, देवराम चौधरी, संतोष झिंजाड सांगत होते.

सोयाबीन, कांदा रोपे, भाजीपाला वाहून गेला. अनेक ठिकाणी शेतीचे ओढे झाले. तलाव झाले, अशी परिस्थिती पावसाने केल्याचे रमेश कनिंगध्वज, विशाल घोलप यांनी सांगितले. रांधे परिसरात असणाऱ्या आमच्या शेतीची अशीच अवस्था झाली, असे बबन नागू चौगुले, बबुसा नागू चौगुले यांनी सांगितले. तेथीलच साबळे वस्तीवरील रस्ता वाहून गेला असे हौसभाऊ चौधरी यांच्या शेतातील नाला फुटला. सखाराम झिंजाड यांच्या शेतातील नाला फुटून विहीर माती, दगडात गाडली गेली.

घरात पाणी घुसून मोठे नुकसान…

शेरी कासारे येथील बाजीराव शिवाजी जाधव, जाणकू भाऊ काळे, सीताराम रामभाऊ जाधव, संतोष बाळू जाधव, विठ्ठल जाणकू काळे, शिवाजी लक्ष्मण जाधव यांच्या घरात पाणी घुसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे प्रकाश पोखरकर यांनी सांगितले.

शेकडो एकर शेती वाहून गेली…..

अळकुटी, गारखिंडी, रांधे, शेरी कासारे, कळस या गावामधील शेकडो एकर जमीन रविवारच्या पावसाने वाहून गेली असल्याचे प्रकाश पोखरकर, खंडू पोखरकर, रमेश कनिगध्वज, अशोक कनिगध्वज, राहुल साबळे, दिलीप जाधव, प्रभाकर जाधव, माजी सरपंच बाजीराव जाधव, रवी काळे, विठ्ठल काळे सांगत होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी फिरकले नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: Parner rain like cloud burst, hundreds of acres of agriculture were washed away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here