Home अहमदनगर अहमदनगर: आदिवासी तरुणाचा खून  करून फेकले नदीत

अहमदनगर: आदिवासी तरुणाचा खून  करून फेकले नदीत

Ahmednagar | Shrirampur Murder Case: दीपक बर्डे प्रकरणात आरोपींची कबुली.

tribal youth was Murder and thrown in the river

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : राज्यभर चर्चेत आलेल्या भोकर (ता. श्रीरामपूर) येथील अपहृत आदिवासी तरुणाचा खून करून मृतदेह नदीपात्रात फेकून दिल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. त्यावरून गोदावरी नदीपात्रात कमालपूरपासून ६० ते ७० किलोमीटर अंतरापर्यंत मृतदेहाचा शोध सुरू आहे.

भोकर येथील तरुण दीपक बर्डे हा ३१ ऑगस्टपासून बेपत्ता होता. त्याच्या अपहरणप्रकरणी तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गुन्ह्यात एकूण सात आरोपी अटकेत आहेत. त्यात मजनू बन (वय ४७, रा. भोकर), समीर अहमद शेख (२८, खोकर), इम्रान अब्बास शेख (३४, खोकर), अजिज बबन शेख (४४, खोकर),  राजू बबन शेख (३९, खोकर), इकबाल सिकंदर शेख (३५, टाकळीभान), रमजान रफीक खान (२९, वाघोली, पुणे) यांचा समावेश आहे.

आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीत धक्कादायक बाबी समोर आल्या. दीपक बर्डे याचा खून करून त्याला कमालपूर येथील पुलावरून गोदावरी नदीपात्रात फेकून देण्यात आले. त्यामुळे पोलीस यंत्रणेसमोर दीपक याचा मृतदेह शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यातच भाजप नेते आमदार नीतेश राणे यांनी शनिवारी जनआक्रोश आंदोलन केले होते. त्यामुळे या प्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

प्रेमप्रकरणाची किनार दीपक तसेच एका स्थानिक मुलीच्या प्रेमप्रकरणातून आरोपींनी हा गुन्हा केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी ‘लोकमत’ला दिली. ही मुलगी सज्ञान आहे. तसेच फूस लावून पळवून नेल्याचा हा प्रकार नाही. दोघांतील संमतीने ते घराबाहेर पडले होते, असेही भोर यांनी सांगितले.

५० पेक्षा जास्त पोलीस, एनडीआरएफ दल, सहा बोटींद्वारे शोध पोलीस प्रशासनाने दीपक याच्या शोधासाठी गेल्या दोन दिवसांपासून शोधमोहीम राबविली आहे. त्याकरिता दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, तीन पोलीस उपअधीक्षक, सात पोलीस निरीक्षक तसेच ५० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा पाचारण करण्यात आला आहे. कमालपूरपासून प्रवरासंगम परिसरातील गोदावरी नदीपात्रात सहा बोटींद्वारे दीपकचा शोध घेतला जात आहे.

 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) दाखल झाले आहे. मात्र, गोदावरी नदीला असलेल्या जास्तीच्या पाण्यामुळे शोध कार्यात अडचणी येत आहेत.

पोलिसांनी प्रवरासंगमच्या खाली जायकवाडीच्या बॅकवॉटरपर्यंत मृतदेहाचा शोध सुरु केला आहे. मात्र, त्यास अद्याप यश आलेले नाही.

Web Title: tribal youth was Murder and thrown in the river

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here