Home अकोले राजूर: एकाच फोन कॉलवर ग्रामस्थांना मिळणार आपत्तीची माहिती- ग्राम सुरक्षा यंत्रणा

राजूर: एकाच फोन कॉलवर ग्रामस्थांना मिळणार आपत्तीची माहिती- ग्राम सुरक्षा यंत्रणा

Rajur Gram Suraksha Yantrana: संकट अथवा आपत्ती आल्यास ग्रामसुरक्षा यंत्रणेतील फोन कॉल द्वारे गावातील सर्व मोबाईल धारकांना काही क्षणातच संकट अथवा आपत्तीची माहिती मिळणार.

disaster information on a single phone call - Village Security System

राजूर: कोणतेही संकट अथवा आपत्ती आल्यास ग्रामसुरक्षा यंत्रणेतील फोन कॉल द्वारे गावातील सर्व मोबाईल धारकांना काही क्षणातच संकट अथवा आपत्तीची माहिती मिळणार असून त्या संकटाशी अथवा आपत्तीशी काही मिनिटातच सामूहिक मुकाबला ग्रामस्थांना करता येईल. राजूर  ता. अकोले ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसुरक्षा यंत्रणेची सेवा ग्रामस्थांना देणार असल्याचे उप सरपंच संतोष बनसोडे यांनी सांगितले.

ग्रामसुरक्षा यंत्रणेचे जनक डी. के. गोर्डे यांच्या मार्गदर्शनातून व राजूर चे सरपंच पुष्पाताई निगळे व उप सरपंच संतोष बनसोडे यांच्या संकल्पनेतून ग्राम सुरक्षा यंत्रणा वापर आणि गरज याविषयी राजूर येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर  येथे विद्यार्थ्यांना  प्रबोधन सभा पार पडली. ग्रामसुरक्षा यंत्रणेचे वरिष्ठ विभागीय अधिकारी डी. के. गोर्डे, अकोले पोलीस स्टेशनचे स.पो.नि. इंगळे  यावेळेस उपस्थित होते .

चोरी, दरोडे, विषारी सर्पदंश, लहान मूल हरवणे, बिबट्याचा हल्ला, आग, वाहन चोरी, अपघात, महिलांची छेडछाड, शाळेकडील सूचना, पोलिसांकडील सूचना आदी गोष्टी प्रत्येकापर्यंत पोहोचवणे अवघड असतात मात्र जेव्हा घटना घडते तेव्हा मात्र ही यंत्रणा हातात असल्यास आपल्या जवळील मोबाईल मधून ग्रामसुरक्षा यंत्रणेला माहिती दिल्यास क्षणातच गावातील सर्व मोबाईलवर हा कॉल जातो. त्यामुळे सर्वांना संकटाची सूचना मिळते परिणामी मदतीसाठी पोहोचता येते.

युटूब वरून कसे पैसे कमवायचे | Earn Money Online

या यंत्रणेच्या वापरामुळे गुन्हेगारांना चांगलीच जरब बसली असून गुन्हयांचे प्रमाणही आटोक्यात राहणार असल्याची माहिती यंत्रणेचे वरिष्ठ विभागीय अधिकारी डी. के. गोर्डे यांनी सांगितले. स.पो.नि. इंगळे  यांनी ही मनोगत व्यक्त केले. उप सरपंच संतोष बनसोडे  यांनी ग्रामस्थांना ग्रामपंचायत च्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच पुष्पाताई निगळे, उपसरपंच संतोष बनसोडे,  प्राचार्य एम. डी. लेंडे, उप प्राचार्य बी. एन. ताजणे व सर्व शिक्षक उपस्थित  होते.

आपत्कालीन संपर्क यंत्रणा नंबर:  १८०० २७० ३६००

Download Now:  Gram Suraksha Yantrana App

Web Title: disaster information on a single phone call – Village Security System

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here