Home अहमदनगर अहमदनगर घटना: शेतीपंपाची वीज तोडल्याने शेतकर्‍याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर घटना: शेतीपंपाची वीज तोडल्याने शेतकर्‍याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagar Suicide:  एका शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना, शेतीपंपाची वीज तोडल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केल्याचा नातेवाईक यांचा आरोप, शेतकरी संतप्त.

farmer committed suicide by hanging himself in the field

अकोळनेर (ता. नगर): येथील शेतकरी पोपट आबाजी जाधव (वय 55) यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. महावितरण कंपनीने शेतकर्‍यांच्या शेतीपंपाची वीज तोडल्यामुळे पिकाला पाणी देता न आल्याने त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. पोपट आबाजी जाधव यांनी शेतातील झाडाला गळफास घेतल्याची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले.

परंतु उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यावेळी रूग्णालय परिसरात त्यांच्या नातेवाईक आणि अकोळनेर ग्रामस्थांचा मोठा जमाव जमा झाला. महावितरण कंपनीच्या त्रासाला कंटाळून जाधव यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. महावितरण कंपनीच्या संबंधीत अधिकार्‍यांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर यांनीही जिल्हा रूग्णालयात धाव घेतली.

जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईक, ग्रामस्थांनी घेतला. अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासोबतची बैठक निष्फळ झाल्याने रात्री उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. मयत पोपट जाधव यांची शेती असून त्यांनी कांदा, गहू आणि हरबरा पेरणी केली असल्यामुळे पेरणी नंतर पिकांना पाण्याची मोठी गरज असते, मात्र महावितरण कंपनीने गेल्या आठ दिवसापासून वीज खंडीत केल्याने पोपट जाधव रोज शेतीमध्ये जाऊन वीजपुरवठा सुरळीत झाला का नाही याची पाहणी करून पुन्हा येत होते.

युटूब वरून कसे पैसे कमवायचे | Earn Money Online

वीज खंडित केली गेल्यामुळे पिकाला असूनही पाणी देऊ शकत नसल्याने आलेल्या नैराश्यातून त्यांनी अखेर शेता जवळील एका झाडाला गळाफास घेऊन आत्महत्या केली आहे, असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी सांगितले.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

या घटनेनंतर नगर तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले असून जोपर्यंत अधिकार्‍यांपर्यंत पोलीस गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला असून रात्री उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. यासंदर्भात नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Web Title: farmer committed suicide by hanging himself in the field

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here