Home अकोले म. रा. मराठी पत्रकार संघाची उदात्त भावना: कोरोना एकल महिलांना किराणा किटचे...

म. रा. मराठी पत्रकार संघाची उदात्त भावना: कोरोना एकल महिलांना किराणा किटचे व साडी वाटप

Akole News: आपण एकटे नाही तर आपल्या पाठीशी समाज आहे यातून या भगिनींना जगण्याचे बळ मिळेल असे प्रतिपादन कोरोना एकल महिला चळवळीचे आधारस्तंभ शिक्षण तज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी
Distribution of grocery kits and sarees to Corona single women
अकोले: आपल्या आनंदात उपेक्षित समुदायाला सहभागी करून घेण्याची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची ही भावना अधिक उदात्त  आहे. पत्रकार केवळ प्रश्न मांडून न थांबता वंचित वर्गाला मदत करत आहेत ही  कौतूकाची गोष्ट आहे. यातून आपण एकटे नाही तर आपल्या पाठीशी समाज आहे यातून या भगिनींना जगण्याचे बळ मिळेल असे प्रतिपादन कोरोना एकल महिला चळवळीचे आधारस्तंभ शिक्षण तज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केले.
      अकोले येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने कोरोना एकल महिलांना किराणा किटचे व साडी वाटप, अकोले नगरपंचायत च्या साफ सफाई कामगारांना, तसेच पत्रकारांना साखर व मिठाई वाटपचा कार्यक्रम आणि स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या अधिकारी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, आ.डॉ .किरण लहामटे यांच्या सुविद्य पत्नी पुष्पाताई लहामटे,अगस्ती चे संचालक पाटीलबा सावंत, सौ.प्रतिभा कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अनिल रहाणे, जिल्हाउपाध्यक्ष प्रा.विद्याचंद्र सातपुते,  जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, तालुकाध्यक्ष अशोकराव उगले, राम एखंडे, इंदोरी चे उपसरपंच एस. के. देशमुख, लिंगदेव ग्रामपंचायत सदस्य कल्पना फापाळे आदींसह कोरोना एकल महिला, आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सहाय्यक परिवहन अधिकारी  कु.निकिता पानसरे व जलसंपदा अभियंता अक्षय देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
    प्रास्ताविकात राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करीत असतो परंतु त्याचबरोबर समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून अनेक समाज उपयोगी अनेक उपक्रम राबवित असतो. मदत आयुष्यभर पुरणारी नाही मात्र आपले दुःख काही प्रमाणात कमी व्हावे ही भावना त्या मागील आहे. पहाटे चारपासून आमच्या नगरपंचायत च्या भगिनी शहर स्वच्छ करण्यासाठी योगदान देतात.त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.त्यासाठी समाजातील अनेक मदतीचे हात पुढे येत असतात.  
   सहाय्यक परिवहन अधिकारी  कु.निकिता पानसरे व जलसंपदा अभियंता अक्षय देशमुख यांनी पत्रकार संघाचा सत्कार हा आम्हाला नेहमी प्रेरणादायी राहील,या सत्कारामुळे इतर युवकांनाही स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याची प्रेरणा मिळेल. पत्रकार संघाने गोरगरीब महिलांसाठी मदतीचा हात देऊन राज्यातील समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
   सूत्रसंचालन पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.विद्याचंद्र सातपुते यांनी  तर आभार गणेश रेवगडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष दत्ता जाधव, उपाध्यक्ष हरिभाऊ फापाळे, खजिनदार सुरेश देशमुख, सुनील गीते, अल्ताफ शेख, राजेंद्र उकिरडे, चंद्रशेखर हासे, संदीप दातखिळे, शंकर संगारे, कुंडलिक वाळेकर,  सुनील शेणकर, सुनील आरोटे, आविष्कार सुरसे, ओंकार अस्वले, सचिन खरात, शशिकांत सरोदे, सचिन लगड यांनी प्रयत्न केले.
मागील दोन वर्षे कोरोना काळात अन्नधान्य किराणा किट चे वाटप केले. यावर्षी कोरोनातील कुटुंब व आरोग्य कर्मचारी यांच्या घरात दिवाळी गोड होण्याचा छोटासा प्रयत्न केला. पुढील वर्षी आदिवासींच्या घरात दिवाळी गोड होण्यासाठी प्रयत्न करणार
— श्री. डॉ.विश्वासराव आरोटे
Web Title: Distribution of grocery kits and sarees to Corona single women

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here