Home क्राईम संगमनेर: औषधे घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला तिघांकडून मारहाण

संगमनेर: औषधे घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला तिघांकडून मारहाण

Sangamner Crime: औषधे घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला तिघांकडून मारहाण संगमनेर शहरातील घटना: गुन्हा दाखल.

Crime young man who went to buy medicines was beaten up by three people

संगमनेर : आईची औषधे घेण्यासाठी मेडिकलमध्ये गेलेल्या ३० वर्षीय तरुणाला त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या तिघांनी किरकोळ कारणावरून मारहाण केली. २३ ऑक्टोबरला रात्री १.२० वाजताच्या सुमारास नवीन नगर रस्ता येथील एका मेडिकलबाहेर मारहाण झाली. यात गंभीर जखमी झालेल्या लागला. तरुणावर शहरातील खासगी मेडिकलच्या मालकाने त्याला रुग्णालयात उपचार सुरू असून समजावून सांगितले. त्यावेळी अक्षय त्याच्या डोक्याला ९ टाके पडले खर्डे याने याला मारून टाका’, असे आहेत. मारहाण करणारे म्हणताच तिघांनी ओझा याला सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

अक्षय खर्डे, आकाश खर्डे आणि मयूर लांडगे अशी मारहाण करणाऱ्या तिघांची नावे आहेत. कृष्णा संजय ओझा (नवीन नगर त्याला रस्ता, अभिनव नगर, संगमनेर, हल्ली आली. रा. हिंजेवडी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, साकरे वस्ती रस्ता, पुणे) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण झालेला तरुण दिवाळीनिमित्त घरी आलेला असताना रात्री १.२० वाजताच्या सुमारास तो आईची औषधे घेण्यासाठी मित्रासोबत नवीन नगर रस्त्यावरील एका मेडिकलमध्ये गेला होता. औषधी घेत असताना वरील गुन्हा दाखल झालेले तिघे जण तेथे आले. अक्षय खर्डे हा चिकटून उभा असल्याने ओझा हा त्याला थोडे बाजूला उभे राहा, असे म्हणाला. त्यानंतर तो ‘तुला काय करायचे ते कर’ असे म्हणत ओझा याला शिवीगाळ करून मारहाण केली. हातातील जाड कड्यांनी कपाळावर, डोक्याला व मानेवर मारहाण झाल्याने डोक्यातून रक्त येऊन ओझा याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतरही खाली पाडून मारहाण करण्यात आली.

ओझा याच्या गळ्यातील नऊ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी आकाश खर्डे याने ओढून घेतली. मारहाण करणाऱ्या तिघांनी जाताना त्यांच्या चारचाकी वाहनाची नंबर प्लेट काढून ते निघून गेल्याचे पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Crime young man who went to buy medicines was beaten up by three people

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here