Home अहमदनगर अहमदनगर: वेटरची गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्येपूर्वी चिठ्ठी

अहमदनगर: वेटरची गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्येपूर्वी चिठ्ठी

Loni Suicide Case: आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली.

Waiter committed suicide by hanging himself

लोणी: लोणी खुर्द येथील शेर-ए  पंजाब हॉटेलमध्ये वेटरने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवार, दि. २३ रोजी घडली. लोणी-बाभळेश्वर रस्त्यालगत चित्रालय चौकात शेर-ए पंजाब हॉटेलमध्ये गेल्या एक वर्षापासून वेटर म्हणून काम करणारा रहीम शेख (वय ५५) याने हॉटेलमधील त्याच्या राहण्याच्या खोलीत पंख्याला केबल बांधून गळफास लावून घेतला.

सकाळी हॉटेल चालकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी लोणी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन कार्यवाही सुरू केल्यानंतर रहीमजवळ त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात आत्महत्येचे कारण लिहिल्याची चर्चा आहे. दरम्यान, ही चिठ्ठी रहिमनेच लिहिली आहे का? याची तपासणी केल्यानंतर दोषींविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार आहे.

Web Title: Waiter committed suicide by hanging himself

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here