खळबळजनक: जिल्हा उपनिबंधक ३० लाखांची लाच घेताना जाळ्यात
Nashik Crime: निवडीविरोधात दाखल झालेल्या प्रकरणात सुनावणी घेऊन तक्रारदार यांच्या बाजूने निर्णय देण्यासाठी ३० लाखांची लाच (caught in bribery of 30 lakhs) घेताना जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक युनिटने त्यांच्या राहत्या घरातून रंगेहात.
नाशिक: जिल्ह्यातील एका कृषी उत्पन्न समितीच्या निवडणुकीमध्ये संचालकपदी निवडून आल्यानंतरही त्यांच्या निवडीविरोधात दाखल झालेल्या प्रकरणात सुनावणी घेऊन तक्रारदार यांच्या बाजूने निर्णय देण्यासाठी ३० लाखांची लाच घेताना जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक युनिटने त्यांच्या राहत्या घरातून रंगेहात पकडले.
खरे यांच्याबरोबर असणारे अॅड. शैलेश सुमातीलाल सभद्रा (वय ३२, रा. रा. उर्वी अपार्टमेंट सौभाग्य नगर, गंगापूर रोड) यांनाही ताब्यात घेतले असून, सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सतिश भाऊराव खरे (५७, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक वर्ग-१) रा. आई हाईट्स, कॉलेज रोड), adv शैलेश सुमातीलाल सभद्रा (३२, रा. उर्वी अपार्टमेंट, सौभाग्यनगर, गंगापूर रोड) अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत.तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, नुकत्याच कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुका पार पडल्या. जिल्ह्यातील एका बाजार समितीमध्ये तक्रारदार हे संचालकपदी कायदेशीर व वैधपणे निवडून आले आहेत. त्यांच्या निवडीविरुद्ध उपनिबंधक खरे यांच्याकडे तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी व निकाल संचालकाच्या बाजूने देण्यासाठी लाचखोर खरे आणि त्याचा एजंट सभद्रा यांनी तब्बल ३० लाख रुपयांची लाच मागितली होती.
सदरची लाचेची रक्कम घेऊन खरे यांनी तक्रारदारास सोमवारी रात्री कॉलेज रोडवरील त्यांच्या राहत्या घरी बोलावले होते त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि तक्रारदाराकडून तीस लाखांची लाच घेताना खरे व त्यांच्या साथीदारास लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली.सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहालदे, उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील, अजय गरुड यांनी केली.घरझडती सुरूदरम्यान विभागाचे अपरधीश नारायण निहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली खरे यांच्या कॉलेज रोडवरील निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत झडती सुरू होती याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Web Title: District deputy registrar caught in bribery of 30 lakhs
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App