Home क्राईम भिंतीला छिद्र पाडून महिलेचे मोबाइलने केले चित्रीकरण; शिक्षक गजाआड

भिंतीला छिद्र पाडून महिलेचे मोबाइलने केले चित्रीकरण; शिक्षक गजाआड

Crime News: एका शिक्षकाने भिंतीला छिद्र पाडून कपडे बदलणाऱ्या महिलांचे चित्रीकरण केल्याचा संतापजनक प्रकार. शिक्षकाला अटक (Arrested).

woman was filmed with a mobile phone after punching a hole in the wall teacher arrested

देसाईगंज | गडचिरोली: विद्यार्थ्यांना नीतिमूल्याचे धडे देणाऱ्या एका शिक्षकाने भिंतीला छिद्र पाडून कपडे बदलणाऱ्या महिलांचे चित्रीकरण केल्याचा संतापजनक प्रकार देसाईगंज येथे सोमवारी उघडकीस आला. एका महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद होताच पोलिसांनी शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, नंदकिशोर भाऊराव धोटे (वय ४५, रा. कुरखेडा, ह.मु. देसाईगंज) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. तो कुरखेडा तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. देसाईगंज येथे स्वतःच्या घरी त्याची पत्नी शिवणकाम करते. त्यामुळे पत्नीकडे महिलांची दिली. रेलचेल असते. कपडे बदलण्यासाठी छोटी खोली तयार केलेली आहे. या खोलीच्या भिंतीला छिद्र पाडून नंदकिशोर धोटे हा मोबाइलद्वारे महिलांचे कपडे बदलतानाचे चित्रीकरण करत असे. यासंदर्भात पीडित महिलेला कुणकुण लागताच तिने देसाईगंज ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे.

Web Title: woman was filmed with a mobile phone after punching a hole in the wall teacher arrested

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here