Home क्राईम धक्कादायक! घरकाम करणाऱ्या मुलीवर बलात्कार, टेरेसवर पाणी बंद करण्यासाठी गेली अन….

धक्कादायक! घरकाम करणाऱ्या मुलीवर बलात्कार, टेरेसवर पाणी बंद करण्यासाठी गेली अन….

Breaking News | Pune Crime: घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने मुलीने दिला बाळाला जन्म.

Domestic worker rape

पुणे : घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यातून मुलगी गरोदर राहून तिने एका बाळाला जन्म दिला आहे. हा धक्कादायक प्रकार मुंबईतील डोंबिवली ईस्ट येथील एका सोसायटीत घडला आहे. याबाबत कोंढवा येथे राहणाऱ्या पीडित मुलीने मंगळवारी (दि.20) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मे 2023 मध्ये घडला आहे.

याबाबत कोंढवा खुर्द येथे राहणाऱ्या 18 वर्षीय पीडित मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन डोंबिवली ईस्ट येथील वामन वजे हाईट्स मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीवर (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) आयपीसी 376, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वडील आरोपी राहात असलेल्या मानपाडा सर्कल येथील वामन वजे हाईट्समध्ये कामाला होते.

पीडित मुलगी वडिलांना मदत करण्यासाठी बिल्डिंगमध्ये घरकाम करण्यासाठी जात होती. मुलगी आरोपीच्या घरात घरकाम करत असल्याने दोघांची ओळख झाली होती. मे 2023 रोजी पीडित मुलगी बिल्डिंगच्या टेरेसवर पाणी बंद करण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी टेरेसवर आला. त्याने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना तिच्यासोबत अश्लील चाळे करुन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक सबंध प्रस्थापित केले.

यानंतर आरोपी मुलीला याबाबत कोणाला काही सांगितले तर घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, मुलगी गरोदर राहून तिने बाळाला जन्म दिला. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन कोंढवा पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हा डोंबिवली पोलिसांकडून कोंढवा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल जाधव करीत आहेत.

Web Title: Domestic worker rape

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here