Home नागपूर खोलीत डांबलं अन् सिलिंडरचा गॅस केला लीक, हत्येचा प्रयत्न करणाऱ्या पतीला अटक

खोलीत डांबलं अन् सिलिंडरचा गॅस केला लीक, हत्येचा प्रयत्न करणाऱ्या पतीला अटक

Breaking News | Nagpur Crime: घरात गॅस सिलिंडर लीक करून पत्नीला ठार मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या पतीला अटक.

room collapsed and the gas cylinder leaked, the husband who tried to murder was arrested

नागपूर:  घरात गॅस सिलिंडर लीक करून पत्नीला ठार मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या पतीला कोराडी पोलिसांनी अटक केली आहे. रंजन गणेशप्रसाद शाय (वय ४६) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  युनिक शैलपुत्री अपार्टमेंट, जगनाडे ले-आऊट, ओमनगर, कोराडी येथे मिनू रंजन शाय (वय ४३) ही पती रंजन व मुलांसह राहतआहे. १९ फेब्रुवारीला दुपारी २ वाजताच्या सुमारास आरोपी रंजन याने घरी मिनू, १४ वर्षीय भाचा व ८ वर्षीय भाची यांना एका खोलीत डांबले.

तसेच सिलेंडरचा पाईप काढून घेत आत गॅस लीक केली. यानंतर हातात माचिस घेत मिनू यांना ठार मारण्याच्या प्रयत्न केला. अपार्टमेंटमधील लोकांच्या जिवीतास धोका निर्माण केला. विवेककुमार शिवकुमार लाल (वय ३१, रा. बोरकुटे ले-आऊट, नरेंद्रनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्वरित घटनास्थळी फायर ब्रिगेडला बोलाविले व आरोपीला ताब्यात घेण्यात आले.  पोलिसांनी कलम ३०७, ३३६, २८६, ५०६(२) भादंवि अन्वये गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

Web Title: room collapsed and the gas cylinder leaked, the husband who tried to murder was arrested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here