Home अकोले ठाणेच्या अविष्यत  संस्थेकडून अकोले तालुक्याला पावणे पाच लाख रुपयांच्या  औषधांची मदत

ठाणेच्या अविष्यत  संस्थेकडून अकोले तालुक्याला पावणे पाच लाख रुपयांच्या  औषधांची मदत

Donation of medicines worth Rs. 5 lakhs to Akole from Avisyat Sanstha

अकोले ( प्रतिनिधी): ठाणे येथील अविष्यत  ट्रस्ट या संस्थेने अकोले तालुक्यातील करोना रुग्णांसाठी पावणे पाच लाख रुपयांची औषधे पाठवली आहेत. या औषधांचे विविध करोना केंद्रांसाठी वितरण करण्यात आले. सुगाव येथील 50 ऑक्सिजन बेड ची सुविधा असणाऱ्या करोना केंद्राला ही या संस्थेने यापूर्वी एक लाख रुपयांची मदत केली आहे.

अकोले तालुक्यातील शिक्षक बांधवांच्या सहकार्याने  सुरू केलेल्या सुगाव कोविड सेन्टरला अविष्यतने 1 लाख रुपयांचा  निधी अगोदरच  दिला होता.  त्यांनी पाठवलेल्या 4 लाख 72 हजार इतक्या रकमेच्या औषधांचे वितरणही शिक्षक व आरोग्यसेवकांच्या माध्यमातून तालुकाभरच्या कोविड सेन्टरर्सला करण्यात आले. येथील अगस्ति विद्यालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. श्यामकांत शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली अगस्ती  शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सतिष नाईकवाडी,अगस्ति विद्यालयाचे प्राचार्य श्री. अभंग  यांच्या हस्ते या औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनिल धुमाळ, घनश्याम माने, प्रकाश आरोटे, शिवाजी देशमुख, राजीव देशमुख, भाऊसाहेब चासकर, धनंजय भांगरे, प्रकाश सुर्वे, विलास गोसावी, भीमाशंकर तोरमल,विजय उगले, गणेश आवारी आदी शिक्षक व निवडक आरोग्यसेवक हजर होते.

या औषधांचं वितरण तालुकभरातील अगस्ती मंदिर,सुगाव खुर्द, समशेरपूर,कळस कोतुळ,ब्रा ह्मणवाडा, धामणगाव, धुमाळवाड, इंदोरी,राजूर ,गणोरे येथील सरकारी व स्वयंसेवी संस्थानी सुरू केलेल्या कोविड सेंटर्स साठी करण्यात आले. या औषधांमुळे आम्हाला समाजासाठी काम करण्यास अधिक ऊर्जा मिळेल असं मत या वेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन जोशी,  सागर वाकचौरे व संदीप दराडे यांनी व्यक्त केले. तर  सुनिल धुमाळ यांनी अविष्यतचे आभार मानताना ट्रस्टचे अध्यक्ष  मिलिंद बागुल व  अविष्यत ची टीम  ही अकोलेकरांसाठी देवदूत असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याशी संपर्क करून देणाऱ्या प्रकाश सुर्वे व  गणेश साळवे यांचे आभार मानले.

ठाणे येथील  अविष्यत ट्रस्ट ही  ग्रामीण भागात काम करणारी संस्था आहे. मागील तीन वर्षापासून ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी यांच्या शिक्षणावरही ही संस्था  मोठ्या प्रमाणात काम करत असते.

या संस्थेतील सर्व लोक पगारदार आहेत. सामाजिक बांधिलकी च्या भावनेतून आपल्या पगाराचा काही भाग बाजूला काढून समाजासाठी हे लोक काम करत आहे. अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील शिळवंडी शाळा वॉशरूम बांधकाम, विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप, गरीब विद्यार्थी यांना शिक्षनासाठी दत्तक घेणे, याशिवाय लॉक डाऊन मध्ये  गोर  गरिबांना किराणा वाटप या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले.

कोविड बरोबरच युद्ध ऐन ऐरणीवर आलेलं असताना ठाण्यातील अविष्यत नावाची संस्था अकोलेकरांच्या मदतीला धावून आली आहे. अकोल्यात औषधांचा तुटवडा जाणवत असल्याने शिक्षक समन्वय समितीने संस्थेचे अध्यक्ष  मिलिंद बागुल व अविष्यत ची टीम यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार संस्थेने  पावणे पाच लाख रुपयांची औषधे तातडीने पाठवली. त्यामुळे तालुक्यातील गोर गरीब रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार शक्य होणार आहे. अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी या औषधांची मोठी मदत होणार आहे”

Web Title: Donation of medicines worth Rs. 5 lakhs to Akole from Avisyat Sanstha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here