Home Accident News संगमनेर तालुक्यात चौफुलीवर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात

संगमनेर तालुक्यात चौफुलीवर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात

Sangamner taluka Two truck Accident

संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे दोन मालवाहतूक ट्रकच्या धडकेत एक ट्रक दुकानात तर दुसरा ट्रक विजेच्या खांबाला जाऊन आदळला. ही घटना शनिवारी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास घडली.  दुकानाच्या शेजारी राहत असलेले शंकर उपाध्ये यांचे कुटुंब या अपघातात वाचले.

हा अपघात एवढा भीषण होता की, यात दुकानाचे नुकसान झाले तर दुसऱ्या ट्रकने विजेचा खांबच वाकून गेला, या अपघातात उपाध्ये कुटुंबीयावर काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी परिस्थिती घटनास्थळी अनुभवायास मिळाली.

याबाबत माहिती अशी की, एक मालवाहतूक ट्रक क्रमांक एच.आर. ६५ ९०९६ हा लोणीकडून नांदूर शिंगोटेच्या दिशेने जात असताना त्याचवेळी संगमनेरकडून कोपरगावच्या दिशेने येणारा दुसरा मालवाहतूक ट्रक क्रमान एमपी. ०९ एचजी. ७७८५ हा अचानक भरधाव वेगाने नांदूर शिंगोटेकडे जाणाऱ्या ट्रकवर धडकला. या अपघातात चौफुलीपासून काही अंतरावर असलेल्या दुकानावर कोपरगावकडे जाणारा वाहतूक ट्रक हा खांबावर जाऊन आदळला. या अपघातात रामदास माने यांच्या मालकीचे दुकानाचे मोठे नुकसान झाले. सदर घटनेनंतर ट्रकचे चालक घटनास्थळावरून पळून गेला. या अपघाताची माहिती संगमनेर तालुका स्टेशनला माहिती देण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाबा खेडकर हे करीत आहे.   

Web Title: Sangamner taluka Two truck Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here