Home क्राईम किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला प्रकरणी आठ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला प्रकरणी आठ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

Eight Shiv Sainikscrime Filed in attack on Kirit Somaiya

पुणे: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर काल पुणे महानगरपालिकेत शिवसैनिकांनी केला होता, शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे आणि त्याची काही साथीदार सोमय्या यांना निवेदन देण्याकरिता सता त्या ठिकाणी झटपट झाल्यावर शिवसैनिकांनी सोमय्या यांच्यावर हल्ला केला होता. पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी ७ ते ८ शिवसैनिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना शनिवारी पुण्यामध्ये शिवसेनेकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. या झटापटीत सोमय्या हे पायऱ्यांवर कोसळले कोसळून जखमी झाले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संचेती रुग्णालयात जाऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधीर शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. किरीट सोमय्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही लोकशाही आहे की गुंडाराज, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी पुणे येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३३७ यानुसार सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Eight Shiv Sainikscrime Filed in attack on Kirit Somaiya

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here