Home महाराष्ट्र शिवसेना पदाधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

शिवसेना पदाधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Shiv Sena office bearers charged with molestation

नवी मुंबई : नवी मुंबई येथील दोन शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या विरोधात विनयभंगाचा (Molestation)  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडघरमध्ये राहणाऱ्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील आणि खारघर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख शंकर ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला घरकाम करत असून पतीपासून विभक्त राहते. या महिलेचे आणि तिच्या एका मित्राचे खाजगी फोटो बबन पाटील आणि शंकर ठाकूर यांनी समाज माध्यमांवर व्हायरल केल्याचा आरोप आहे. तसेच याचा जाब विचारण्यासाठी गेले असता गलिच्छ भाषेत बोलत धक्काबुक्की केल्याची तक्रार या महिलेने केली आहे.

जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी या महिलेचे आणि तिच्या मित्राचे फोटो बॅनरवर लावून बदनाम करण्याची धमकी देखील यावेळी देण्यात आली,  गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Shiv Sena office bearers charged with molestation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here