Home नाशिक एकनाथ शिंदेंचा छगन भुजबळ यांना या निर्णयाने दिला मोठा दणका

एकनाथ शिंदेंचा छगन भुजबळ यांना या निर्णयाने दिला मोठा दणका

Eknath Shinde's decision hit Chhagan Bhujbal hard

 

Nashik | नाशिक: शिवसेनेच्या ३९ आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. बंडखोर आमदारांच्या पाठींब्यावर भाजपने सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे विराजमान झाले आहे. शिंदे यांनी नाशिक जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या ६०० कोटींच्या कामांना ब्रेक दिला आहे.

एकनाथ शिंदे यांनी पहिल्याच दिवशी माजी मंत्री छगन भुजबळ यांना दणका दिला आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी ६०० कोटींच्या कामांना घाईघाईने मंजुरी कशासाठी दिली असा प्रश्न उपस्थित केला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या ६०० कोटींच्या कामांना ब्रेक दिला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल मंत्रालयातील कामाचा आढावा घेतला. बंद असलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याचे निर्देश यावेळी दिले.

Web Title: Eknath Shinde’s decision hit Chhagan Bhujbal hard

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here