Home अहमदनगर अहमदनगर: दरड कोसळून महिलेचा मृत्यू

अहमदनगर: दरड कोसळून महिलेचा मृत्यू

Shrogonda Woman dies due to pain

श्रीगोंदा | Shrigonda: उत्तराखंड राज्यात केदारनाथ येथे तीर्थयात्रेसाठी गेलेल्या काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील महिलेचा बसवर दरड कोसळल्याने मृत्यू (Dies) झाला. ही घटना बुधवारी (दि.२७)घडली.

पुष्पा मोहन दांगट (वय ५६, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा), असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

पुष्पा दांगट या तीर्थयात्रेसाठी केदारनाथ येथे गेल्या होत्या. केदारनाथ येथे बसमधून प्रवास करीत असताना पुष्पा दांगट या चालकाच्या मागील सीटवर बसल्या होत्या. यावेळी बसवर दरड कोसळली.

यामध्ये पुष्पा दांगट यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळाजवळ असलेले वाळकी येथील युवक मनोज भालसिंग यांनी काही जखमींना बाहेर काढले. पुष्पा दांगट यांचे शवविच्छेदन करून मृतदेह काष्टीला पाठविण्यासाठी ..त्याने मदत केली. त्यांच्या मागे पती, दोन मुले, मुलगी, सुना असा परिवार आहे.

या अपघातात वाहनातील १० जण जखमी झाले, तर एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. पोलीस आणि आपत्ती नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी ३.५० वाजता केदारनाथ महामार्गावरील मुंकटियाजवळील डोंगरावरून अचानक दगड पडले. एका प्रवासी वाहनाला त्याची धडक बसली. जखमींपैकी पाच महाराष्ट्रातील नगर, तीन बिहारमधील पाटणा, एक स्थानिक रहिवासी आणि दोन नेपाळ मधील आहेत. जखमींमध्ये एका १२ वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.

Web Title: Shrogonda Woman dies due to pain

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here