Home महाराष्ट्र Rain | राज्यात पुढील चार ते पाच दिवस मान्सून सक्रीय राहण्याची शक्यता

Rain | राज्यात पुढील चार ते पाच दिवस मान्सून सक्रीय राहण्याची शक्यता

Rain Alert monsoon is likely to remain active in the state for the next four to five days

मुंबई: कोकण व मुंबई उपनगरात पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची (Rain) शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच राज्यात पुढील चार ते पाच दिवस संपूर्ण राज्यात मान्सून सक्रीय राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबई महापालिकेला अलर्ट, तर कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे परिसरासह कोकण विभागांत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, आणखी चार दिवस काही भागांत जोरदार पावसाच्या सरी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दरम्यान अकोले तालुक्यातील भंडारदरा पाणलोटक्षेत्रात पावसाच्या सरी सक्रीय झाल्या असून कमी अधिक प्रमाणात पाउस कोसळत आहे. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले तीन दिवस चांगला पाऊस कोसळत आहे. शेतीच्या कामांना वेग आला आहे. तर रायगड जिल्ह्यातही चांगला पाऊस पडत आहे. काल मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस झाला.

Web Title: Rain Alert monsoon is likely to remain active in the state for the next four to five days

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here