Home अहमदनगर अहमदनगर: टेम्पोमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

अहमदनगर: टेम्पोमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

finding dead body in Tempo

Shrirampur | श्रीरामपूर: शहरातील दळवी वस्ती परिसरातील सचिन विश्वास सराफ (वय ४८) हे मालवाहतूक टेम्पोच्या कॅबिनमध्ये मृत (Dead body) अवस्थेत आढळून आले. ते टेम्पोत कधी बसले होते व मृत्यू कसा झाला याचे निश्चित कारण समजू शकले नाही. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

कुटुंबीयांनी सराफ यांना साखर  कामगार रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच निधन झाल्याचे घोषित केले. रुग्णालयाच्या पत्रावरून शहर पोलिसांनी सराफ यांच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

श्रीरामपूर: तरुणाची आत्महत्या

श्रीरामपूर शहरातील भीमनगर परिसरातील गोरख नारायण मोरे (वय ३५) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. आत्महत्येचे निश्चित कारण समजू  शकले नाही. मयताच्या नातेवाइकांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत गोरख यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, चार मुली असा परिवार आहे.

Web Title: finding dead body in Tempo

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here