अनैतिक संबंधाच्या संशयातून लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून
लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात दगड घालून खून (Murder) केल्याची घटना.
उल्हासनगर: शहाड फाटक परिसरातील रोहित कांगोरे याची डोक्यात दगड घालून लहान भावानेच हत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. पोलिसांनी लहान भाऊ अमित कांगोरे याला अटक केली असून, अनैतिक संबंधाच्या संशयातून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नंबर १ शहाड फाटक परिसरात रोहित आणि अमित रमेश कांगोरे हे भाऊ कुटुंबासह राहतात. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास दोन्ही भावात तू-तू मैं-मैं झाली. रागाच्या भरात अमित याने मोठा भाऊ रोहित याच्या डोक्यात जात्याचा दगड घातला. बेशुद्ध रोहितला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक फुलपगारे त्यांनी आरोपी भाऊ अमित याला अटक केली.
अनैतिक संबंधाच्या संशयातून लहान भावानेच मोठ्या भावाचा खून केल्याचे उघड झाल्याचे फुलपगारे यांनी सांगितले. उल्हासनगर पोलिस ठाण्यात अमितवर खुनाचा गुन्हा नोंदविला असून, त्याला अटक झाली आहे. मृत रोहितचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला जाईल.
Web Title: Eder brother Murder by younger brother an suspicion of immoral relationship in Ulhasnagar
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App