भावी पत्नीवर अत्याचार करून खून, आत्महत्येचा बनाव
Jalana Crime News: मोबाइल गिफ्ट दिला. तिच्यावर अत्याचार (abudsed) करून तिचा खून (Murder) केला.
जालना: चारित्र्याच्या संशयावरून मंठा तालुक्यातील बेलोरा येथील दीप्ती ऊर्फ सपना संदीप जाधव (१७) हिचा खून करण्यापूर्वी संशयित सुशील पवार याने मोबाइल गिफ्ट दिला. नंतर चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केला. तेथून थेट अहमदाबाद गाठले. तेथे काम न मिळाल्याने तो परत मुंबईत आला. त्याचवेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक भागवत कदम यांनी दिली.
दीप्ती ऊर्फ सपना हिचा मेहकर तालुक्यातील वरुड येथील सुशील पवार या तरुणासोबत विवाह जुळला होता. त्याचवेळी सपनाच्या चारित्र्यावर सुशील संशय घेऊ लागला. १८ फेब्रुवारी रोजी वधू आणि वर पक्षांकडील मंडळी दुसरबीड येथे लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी गेले होते. हीच संधी साधून सुशीलने थेट बेलोरा गाठले. घरी भावी नवरी सपना एकटीच होती. त्याने तिला मोबाइल गिफ्ट दिला. तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला.
पोलिसांनी सुशील पवार याला अटक करून विचारपूस केली असता, त्याने सपनाने आत्महत्या केल्याचे सांगितले. पोलिस खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली. त्याला २८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Web Title: Murder of future wife by abused fake suicide
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App