Home अकोले गाव विकासाचा गाडा समर्थपणे चालविण्यासाठी चांगले कारभारी निवडून आले पाहिजे: वैभवराव पिचड

गाव विकासाचा गाडा समर्थपणे चालविण्यासाठी चांगले कारभारी निवडून आले पाहिजे: वैभवराव पिचड

Elected to run the village development cart efficiently Vaibhavrao Pichad

अकोले | Akole: ग्रामपंचायत निवडणूक कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकतीने लढवताना आपले सर्व कार्यकर्तेना बरोबर घ्यावे असे आवाहन भाजपचे युवा नेते वैभवराव पिचड यांनी केले.

भाजपा कार्यालयात आयोजित तालुका कार्यकारणीच्या पहिल्या बैठकीत श्री. पिचड बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे हे होते. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, वसंतराव मनकर, सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्ता देशमुख, अकोले एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष जे.डी. आंबरे, अमृतसागर दूध संघाचे संचालक विठ्ठलराव चासकर, अगस्ति साखर कारखान्याचे संचालक कचरू शेटे, अशोक देशमुख, राजेंद्र डावरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब कासार, बाळासाहेब सावंत, पंस सदस्य गोरख पथवे, माधवी जगधने, अलका अवसरकर आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत हा आता गावच्या विकासाचे केंद्रबिंदू बनला असून गाव विकासाचा गाडा समर्थपणे चालविण्यासाठी चांगले कारभारी निवडून आले पाहिजे. यासाठी नेत्यांनी सुशिक्षित युवकांचा विचार करून आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांचा प्राधान्य द्या बाहेरील आयात उमेदवार करू नये असे स्पष्ट मत व्यक्त केले. विधानसभेत झालेले चुकीचे मतदान आता तालुक्यातील जनता भोगीत असून पक्ष संघटना मजबूत करावी. नवीन पदाधिकारी यांनी जबाबदारीने कार्य करीत पक्ष वाढविण्यासाठी काम करण्याचा सल्ला ही श्री.पिचड यांनी दिला.

भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांनी पक्षातील पदे ही जबाबदारी असून भाजपा त काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल. संघटनात्मक काम वाढविण्यासाठी सरचिटणीस व उपाध्यक्ष, सचिव याना जिप गट, गणानुसार काम विभागणी करण्यात आली.

यावेळी वसंतराव मनकर, राजेंद्र देशमुख, सौ शारदा गायकर, भरत घाणे, सुभाष वाकचौरे, गणेश पोखरकर, बाबासाहेब उगले, बाबासाहेब आभाळे, भाऊसाहेब गोडसे, राहुल देशमुख, अविनाश तळेकर, नाजीम शेख, विठ्ठल कानवडे, ज्ञानेश पुंडे, अमोल गोडसे, दत्तात्रय वाकचौरे, वैशाली सावंत, यांनी निवडणूक व संघटना विषयी मते व्यक्त केली.

बैठकीचे प्रास्ताविक सरचिटणीस यशवंत आभाळे यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब वाकचौरे यांनी तर शेवटी आभार मच्छिंद्र मंडलीक यांनी मानले.

Web Title: Elected to run the village development cart efficiently Vaibhavrao Pichad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here