Home अहमदनगर चुलत्यानेच घातला पुतण्याच्या डोक्यात दगड, आरोपीस अटक

चुलत्यानेच घातला पुतण्याच्या डोक्यात दगड, आरोपीस अटक

Parner Accused arrested for throwing stones

पारनेर | Parner: पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे चुलात्यानेच पुतण्याच्या डोक्यात दगड घालून पलायन केल्याची घटना सोमवारी रात्री घडली.

 राहुरी तालुक्यातील गावाकडे पुतण्यास घेऊन जाणाऱ्या चुलत्याने वाटेत वादावादी करून पुतण्याच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले आहे. त्यास नगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

पुतण्याच्या डोक्यात दगड घालून पलायन करणाऱ्या चुलत्यास ढवळपुरीत पोलिसांनी अटक केली आहे.

राहुरी तालुक्यातील निंबेरे येथील सांगळे परिवारातील सदस्य पारनेर तालुक्यात वासुंदे परिसरात बांधकाममध्ये सेंटरिंगचे काम करत असत. सोमवारी रात्री ८ वाजेच्या दरम्यान शांताराम निवृत्ती सांगळे हा आपला पुतण्या सोन्याबापू भीमराज सांगळे यास गावाकडे घेऊन निघाला असता रस्त्यात चुलत्याने सोन्याबापूसोबत वाद केला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यात शांताराम याने सोन्याबापू याच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे.

सोन्याबापू चा भाऊ रामनाथ भीमराज सांगळे याने चुलता याच्या विरोधात फिर्याद दिल्याने चुलता शांताराम निवृत्ती सांगळे याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बळप हे अधिक तपास करीत आहेत.  

Web Title: Parner Accused arrested for throwing stones

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here