Home महाराष्ट्र ठाकरे सरकारचा धक्का: वीज बिल भरावेच लागेल, कुठलीही माफी नाही  

ठाकरे सरकारचा धक्का: वीज बिल भरावेच लागेल, कुठलीही माफी नाही  

Electricity News to pay the electricity bill there is no excuse

मुंबई(Electricity News): महावितरणाने वाढीव वीज बिलाचा शॉक दिला होता. वीज बिलात सवलत मिळावी अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र लोकांनी वीज वापरली तर बिल भरावे लागेल कोणतीही वीज बिल माफी मिळणार नाही असा धक्का ठाकरे सरकारने जनतेला दिला आहे.

याबाबत उर्जामंत्री नितीन राउत म्हणाले आहे की, वीज वापरली असेल तर बिल हे भरावेच लागेल. लॉकडाऊन काळातील वीजबिल भरली पाहिजे, आम्ही सुद्धा ग्राहकच आहोत. कर्ज घेऊन मदत करीत आहोत. वीज बिल सवलतीचा विषय नाही असे त्यांनी सांगितल्याने सर्वसामान्य जनतेला झटका बसला आहे.  

तुम्ही जसे ग्राहक आहात तसे आम्ही पण ग्राहक आहोत. आम्ही सुद्धा वीज बिल देतो. वाढीव बिले असतील तर चौकशी सुरु आहे. पण ज्यांनी वीज वापरली त्यांना बिले भरावीच लागतील. कोणाचाही वीजपुरावठा खंडित होणार नाही. राज्यातील वीजबिल सवलतीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता, मात्र केंद्र सरकारने मदत केली नाही. त्यामुळे वीज बिलात माफी नाही असे नितीन राउत म्हणाले.

महावितरणने लॉकडाऊन काळात वीज पुरविली. वीज लोकांनी वापरली, महावितरणवर ६९ हजार कोटी कर्ज आहे. कर्ज काढून कामकाज सुरु आहे. अजून किती करणार असेही नितीन राउत म्हणाले.

वीजबिल भरण्याबाबत महावितरणाने परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार डिसेंबर २०२० पर्यंत वीज बिल भरावेत असे आदेश देण्यात आले आहे.

Web Title: Electricity News to pay the electricity bill there is no excuse

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here