Home महाराष्ट्र माजी सैनिकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

माजी सैनिकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

Latur News: भाड्याच्या घरात वास्तव्याला असलेल्या एका माजी सैनिकाने डोक्यात पिस्टलमधून गोळी झाडून आत्महत्या  (Suicide) केल्याची घटना.

Ex-serviceman commits suicide by shooting himself in the head

लातूर: शहरातील विक्रमनगर भागात भाड्याच्या घरात वास्तव्याला असलेल्या एका माजी सैनिकाने डोक्यात पिस्टलमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेने लातुरात एकच खळबळ उडाली असून, याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सुशीलकुमार वैजनाथ कावळे (वय ४५ रा. चिंचोली बल्लाळनाथ, ता. लातूर) असे मयत माजी सैनिकाचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, माजी सैनिक सुशीलकुमार वैजनाथ कावळे हे लातुरातील विक्रमनगर भागात एका शाळेसमोर भाड्याच्या घरात वास्तव्याला होते. दरम्यान, ते दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. त्यांना दोन मुली असून, त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी लातुरातील विक्रमनगर भागात राहण्याचा निर्णय घेतला होता. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Web Title: Ex-serviceman commits suicide by shooting himself in the head

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here