Home मुंबई बाळासाहेब थोरात यांचा सरकारला इशारा…. अन्यथा न्यायालयात जावे लागेल

बाळासाहेब थोरात यांचा सरकारला इशारा…. अन्यथा न्यायालयात जावे लागेल

ज्यांना मंत्री करू शकत नाही त्यांना भरघोस निधी : आ. बाळासाहेब थोरात.

Balasaheb Thorat's warning to the government

मुंबई: राज्य सरकारने मांडलेल्या ४१ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आमदार फोडण्यासाठी आणि फोडलेले आमदार सांभाळण्यासाठी आहेत. ज्यांना मंत्री करू शकत नाही त्यांना भरघोस निधीची खैरात वाटली आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांना कमी निधी देण्यात आला आहे. यामुळे जनतेमध्ये असंतोष असून, निधीवाटपाचा अन्याय दूर करावा; अन्यथा न्यायालयात जावे लागेल, असा इशारा काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत दिला.

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निधीवाटपावरील स्थगिती कायम आहे. शिंदे-फडणवीस सरकार असमान पद्धतीने निधी वाटप करीत असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

निधीवाटपातील असमानतेचा मुद्दा निकाली काढा, अशी मागणी काँग्रेसचे भाई जगताप यांनी केली, तर आमचा मतदार हा बांग्लादेशचा नागरिक आहे का, असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे सचिन अहिर यांनी केला.

Web Title: Balasaheb Thorat’s warning to the government

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here