Home मनोरंजन मराठीतील सर्वात महागडी अभिनेत्री आर्ची अर्थात रिंकु राजगुरू

मराठीतील सर्वात महागडी अभिनेत्री आर्ची अर्थात रिंकु राजगुरू

सैराट सिनेमाने रिंकुला पैसा, प्रसिद्धी, मॅन,सन्मान, पुरस्कार सारं काही दिलं. रसिकांनी तर भरभरून प्रेम दिलंच, शिवाय राष्ट्रीय पुरस्कारातही रिंकूने बाजी मारली सध्या रिंकूच्या दुसऱ्या सिनेमाची प्रतीक्षा असली तरी ती कायमच आर्ची म्हणून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल.

मूळची अकलूजची असलेल्या रिंकूने आपल्या अभिनयाने साऱ्यांनाच तोंडात बोटं घालायला लावली आहेत असं असलं तरी रिंकुची एक अशी गोष्ट आहे जी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. होय,आतापर्यंत फक्त बॉलिवूड कलाकारांच्या मानधनाविषयी जास्त चर्चा व्हायची पण आता मराठी कलाकारांच्याही मानधनाचे आकडे ऐकून सारेच थक्क होतात. मात्र या सगळ्यांमध्ये आर्चीने सध्या साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. रिंकूने आगामी ‘ मेकअप ‘ सिनेमासाठी तब्बल 27 लाख रुपये मानधन घेतले आहे. सर्वच वयोगटातील रसिकांमध्ये तिची लोकप्रियता तुफान आहे हीच लोकप्रियता इनकॅश करण्यासाठी निर्मात्यांनीही रिंकुला वाढीव मानधन देणे फायद्याचे ठरणार असल्यामुळे सर्वाधिक मानधन घेण्याचा मान आज रिंकूने मिळविला आहे.

Website Title: Expensive actress in Marathi is Rinku Rajguru

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here