अकोले: शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल
Breaking News: बाजीराव दराडे यांच्यावर ठेकेदाराकडून ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
अकोले: शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांच्यावर ठेकेदाराकडून ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाजीराव दराडे यांनी मात्र आपल्या विरुद्ध चे हे राजकीय षडयंत्र असून यामागे तालुक्याच्या विद्यमान आमदारांचा हात असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची तसेच सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी सांगितले तसेच या प्रकरणाचा न्याय निवाडा होईपर्यंत आपण पक्षातील आपल्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा त्यांनी केली.
अकोले तालुक्यातील पिंपळदरावाडी येथील बंधाऱ्याचे काम करणारे घुले कन्स्ट्रक्शन कंपनीचे श्रीकांत दिगंबर यांनी बाजीराव दराडे यांचे विरुद्ध ५० लाख रुपये खंडणी मागत असल्याची तक्रार अकोले पोलिसांत दाखल केली असून याप्रकरणी बाजीराव दराडे व त्यांचे भाऊ संजय दराडे यांच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ डिसेंबर रोजी दराडे यांनी आम्ही राजकारणी , ५० लाख रुपयांची खंडणी नाही तर कंपनीची मशिनरी जाळून टाकू व कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली अशा आशयाची तक्रार काल अकोले पोलिसांत दिल्यावरून त्यांच्यासह भाऊ संजय दराडे विरुद्ध हा खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Web Title: extortion has been registered against Bajirao Darade
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News