Home अहमदनगर रात्री बाराला साईनामाच्या जयघोषाने दुमदुमली शिर्डी, लाखो भाविकांनी घेतले दर्शन

रात्री बाराला साईनामाच्या जयघोषाने दुमदुमली शिर्डी, लाखो भाविकांनी घेतले दर्शन

Breaking News: लाखो साईभक्तांनी साई नावाचा जयघोष करत नव्या वर्षाचे जोरदार स्वागत.

night Shirdi was resounding with the chanting of Sainama

शिर्डी: देश विदेशातील शिडींमध्ये रात्रीच्या बाराच्या ठोक्याची वाट पाहत सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत साई नामाच्या जयघोषाने करीत एकच जल्लोष साईभक्तांनी केला. लाखो साईभक्तांनी साई नावाचा जयघोष करत नव्या वर्षाचे जोरदार स्वागत केले.

३१ डिसेंबरला रात्री बरोबर १२ वाजेच्या ठोक्याला काही साईभक्त मंदिरात थांबण्यासाठी रेंगाळत होते तर काही भक्त द्वारकामाई, चावडी व गुरुस्थान याठिकाणी तळ ठोकून बसले होते. साईभक्तांनी रात्री १२ चा मुहर्त साधला. मात्र थोड्या फार वेळेत मागे पुढे झाल्याने काही भक्तांची निराशा झालेली पहावयास मिळाली. साई संस्थानने रात्रीचे दर्शन चालू ठेवल्याने भक्तांत समाधान पहावयाला मिळाले. नेमकी बारा वाजेच्या सुमारास मंदिर परिसरात सुरक्षा रक्षकांना तारेवरची कसरत करावी लागली.  भाविकांनी दिवसभर शिर्डीत खरेदी, बाहेर जाऊन छोटेखानी दर्शन यात्रा करून बरोबर १२ वाजता येऊन सरत्या वर्षाला निरोप आणि नवं वर्षाचे स्वागत साई दर्शनाने करण्याचा अट्टाहास केलेला पाहायला मिळाला.

शहरातील रस्त्यावर असणारी नववर्षाची गर्दी नव्या दर्शन इमारतीने पहायला मिळाली नाही. नव्या दर्शन बारीमुळे भाविकांना प्रथमतः दर्शनासाठी उभे राहता आले नाही. सर्व गदीं ही साई मंदिर परिसरात द्वारकामाई परिसरात एकवटली होती. एक नंबर प्रवेशद्वार परिसरात मोठी गर्दी पहावयाला मिळाली. नववर्षाच्या स्वागताकरिता शहरात इतर ठिकाणी रंगीबेरंगी अवकाशात फटाके उडू लागले. लख्ख लख्ख साई नगरीत न्हाऊन निघाली होती. नवीन वर्षाच्या स्वागताला साई मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते. यासाठी साईभक्त ए. बसवराजा यांच्या देणगीतून साई मंदिराचा गाभारा ओम साई राम नाव फुलांनी तयार केले होते. ते मुख्य आकर्षण ठरत होते. साई मंदिरात फुलांनी सजवलेला गाभारा भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा होता. दुसऱ्या बाजुला साई प्रसादालयात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रसादालयातील  वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाने रात्री एक तास उशिरा बंद केले. साईभक्तांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची गस्त आणि सुरक्षा वाढविण्यात आली होती. भक्तनिवास गर्दीने हाउसफुल्ल असले तरी अतिरिक्त भक्तनिवासाची सुविधा केलेली असल्यामुळे भाविकांचा सुविधा झाली. भक्तनिवासाच्या ठिकाणी चहाचे उशीरापर्यंत सुरू होते. नववर्षाच्या स्वागतासाठी रविवारी विविध राज्यांतून भाविक शिर्डीत दाखल होत असल्यामुळे शिडीं शहरातील अनेक रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहतूक शाखेच्या पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. शिडींतील खाजगी हॉटेल व लॉज गर्दीने हाउसफुल्ल झाले होते. साईभक्तांची गैरसोय होऊ नये याकरिता प्रभारी कार्यकारी अधिकारी तुकाराम हळवळे व विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी लक्ष देऊन होते. भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असताना देखील शिडींत मोठ्या उत्साहात साई भक्तांनी येणाऱ्या २०२४ चे जल्लोषात स्वागत केले.

Web Title: night Shirdi was resounding with the chanting of Sainama

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here