Home जळगाव धक्कादायक! पती पहाटे तीन वाजता उठला असता पत्नीला पाहून पायाखालची जमीन सरकली

धक्कादायक! पती पहाटे तीन वाजता उठला असता पत्नीला पाहून पायाखालची जमीन सरकली

Breaking News: सर्व जण रात्री जेवण करून झोपले असता मध्यरात्री पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या (Suicide).

Wife committed suicide by hanging herself in the middle of the night 

जळगाव : घरात सर्वांसोबत गप्पा करत सोबत जेवण केले.  जेवण आटोपल्यानंतर परिवारातील सर्वजण झोपले. यानंतर मध्यरात्री विवाहितेने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हि घटना जळगाव तालुक्यातील किनोद येथे घडली असून तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

किनोद (ता.जळगाव) अश्विनी विशाल चौधरी (वय २४) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचे पती विशाल हे जळगावात खाजगी क्षेत्रात काम करून उदरनिर्वाह करतात. दरम्यान ३० डिसेंबरला पहाटे तीन वाजता सदरची घटना उघडकीस आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, २९ डिसेंबरला घरातील सर्व जणांनी सोबत जेवण केले. यानंतर चौधरी कुटुंबीय झोपले. शनिवारी मध्यरात्रीनंतर विवाहितेने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे ३ वाजता पती पाणी पिण्यासाठी उठले असता त्यांनी पत्नीने गळफास घेतल्याचे आढळून आले.

पत्नीने गळफास घेतल्याचे दिसून आल्यानंतर पतीने एकच आक्रोश केला. महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. विवाहितेच्या पश्चात पती, दीड वर्षाचा मुलगा आहे. विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Wife committed suicide by hanging herself in the middle of the night 

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here