Home अहमदनगर स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणारा नराधम शिर्डीत जेरबंद

स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणारा नराधम शिर्डीत जेरबंद

Breaking News: एका नराधमाने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार (Rape) केल्याची घटना.

who Rape his own daughter Arrested in Shirdi

शिर्डी: दोन मुलींचा बाप असलेल्या पुण्यातील एका नराधमाने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. मुलगी गरोदर झाल्यानंतर पत्नीने गुन्हा दाखल करताच या नराधमाने घरातून पळ काढत बागेश्वरधाम व शिर्डीसारख्या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी आश्रय घेतला. साई संस्थानच्या सुरक्षा रक्षकांच्या मदतीने शिर्डी पोलिसांनी आरोपीला पकडून पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

पुण्यात रंगकाम करणाऱ्या या आरोपीला दोन मुली व पत्नी आहे. त्याने एप्रिल २०२३ पासून आपल्याच १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार केला. यातून मुलगी गरोदर राहिली. ही पीडित मुलगी सध्या सात महिन्यांची गरोदर आहे. यासंदर्भात पिडीतेच्या आईने पोटच्या मुलीबरोबर दुष्कृत्य करणाऱ्या आपल्या नवऱ्याच्या विरोधात दि. १० नोव्हेंबर रोजी वानवडी पोलिसांत तक्रार दिली होती.

फिर्याद दाखल होताच हा नराधम गेल्या दीड महिन्यापूर्वी घरातून पसार झाला. बंगलोर, राजस्थान, बागेश्वरधाम येथे काही दिवस आश्रय घेऊन तो सध्या शिर्डीत लपून बसला होता. साईसंस्थानच्या साईउद्यान इमारतीत गेल्या तीन दिवस तो वास्तव्यास असल्याने संस्थानचे कर्मचारी अविनाश आदलिंगे यांना त्याने काहीतरी गुन्हा केला असावा असा संशय बळावला. त्यांनी आपला संशय संस्थानचे सुरक्षा प्रमुख अण्णासाहेब परदेशी यांच्याकडे व्यक्त केला. त्यांनी तातडीने ही बाब पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या कानावर घातली. मिटके यांनी तातडीने या व्यक्तीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने मुलीवर केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर उपअधीक्षक मिटके यांनी पुणे पोलिसांशी संपर्क करून खातरजमा करून आरोपीला पुढील तपासकामी पुणे पोलिसांच्या स्वाधिन केले आहे.

Web Title: who Rape his own daughter Arrested in Shirdi

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here