Home अहमदनगर कॉफी शॉपमध्ये अश्लील चाळे करण्याची सोय, पोलिसांचा छापा

कॉफी शॉपमध्ये अश्लील चाळे करण्याची सोय, पोलिसांचा छापा

Ahmednagar News:  फ्रेण्डशीप कॅफे व कॅफे मराठी कॉफी शॉपमध्ये खाद्यपदार्थ विक्रीच्या नावाखाली अश्लिल चाळे केले जात असल्याची बाब निदर्शनास.

Facilitation of obscene chala in coffee shop, police raid

कर्जत : कर्जत शहरातील फ्रेण्डशीप कॅफे व कॅफे मराठी कॉफी शॉपमध्ये खाद्यपदार्थ विक्रीच्या नावाखाली अश्लिल चाळे केले जात असल्याची बाब निदर्शनास आली असल्याची घटना समोर आली आहे. पोलीस निरिक्षक घनश्याम बळप यांच्या पथकाने दोन्ही शॉपवर छापा टाकून मालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी (दि. १८) पोलीस निरीक्षक बळ यांना शहरातील काळदाते कॉम्प्लेक्समधील कॅफे शॉपमध्ये खाद्यपदार्थ विक्रीच्या नावाखाली तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याची माहिती मिळाली होती. यावेळी बळप यांनी कर्जत पोलिसांसह छापा टाकला असता दोन्ही ठिकाणी मोठं-मोठे कंम्पार्टमेंट करुन मुला-मुलींना जागा उपलब्ध करुन दिल्याचे आढळून आले. त्यानुसार फ्रेण्डशीप कॅफे चालक अजय काकासाहेब निंबाळकर (री. दुरगाव ता. कर्जत) व कॅफे मराठी चालक राहुल बाळु पवार (रा. अक्काबाई नगर, कर्जत) याच्यावर म.पो.अधि. चे क.. ३३ (एक्स) (अ) प्रमाणे कारवाई करण्यात आली.

कर्जत शहर आणि तालुक्यात अवैध धंदे सुरू असल्यास सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या भ्रमणध्वनीवर तात्काळ संपर्क करावा. तसेच कर्जत पोलीस ठाण्याच्या क्रमांकावर कॉल करीत तकार नोंद करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक बळप यांनी केले. तक्रारदाराचे नाव गुपित ठेवण्यात येईल अशी ग्वाही दिली.

Web Title: Facilitation of obscene chala in coffee shop, police raid

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here