प्रसिद्ध अभिनेत्याच्या १६ वर्षीय मुलीची आत्महत्या, Suicide
Suicide News: संगीतकार, अभिनेता आणि निर्माता विजय अँटोनीची मुलगी मीरा हिने आज १९ सप्टेंबरच्या पहाटे आत्महत्या केल्याची घटना.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. प्रसिद्ध तमिळ संगीतकार व अभिनेत्याच्या १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. संगीतकार, अभिनेता आणि निर्माता विजय अँटोनीची मुलगी मीरा हिने आज १९ सप्टेंबरच्या पहाटे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
इंडिया टुडेच्या अहवालानुसार, मीरा तिच्या चेन्नईमधील अलवरपेट येथील राहत्या घरी पहाटे तीन वाजता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. ती चेन्नईतील एका लोकप्रिय शाळेत शिकत होती. रिपोर्ट्सनुसार, ती तणावाखाली होती आणि त्यासाठी तिच्यावर उपचार सुरू होते.
घरातील मदतनीसला मीरा तिच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली, त्यानंतर तिला चेन्नईतील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी तिचा आधीच मृत्यू झाल्याचं सांगितलं. आत्महत्या मागील कारण अद्याप समोर आले नाही.
विजय अँटोनी हे तमिळ चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. संगीतकार, अभिनेता व निर्माता विजयच्या पत्नीचं नाव फातिमा आहे. ती स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सांभाळते. विजय आणि फातिमा यांना मीरा आणि लारा नावाच्या दोन मुली आहेत, त्यातील मीराने आत्महत्या केली आहे. या घटनेने तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
Web Title: Famous actor’s 16-year-old daughter commits suicide
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App