Home क्राईम संगमनेर बनावट पीक विमा हप्त्याच्या पावत्या, शेतकऱ्यांची फसवणूक,  चार लाख लुटले

संगमनेर बनावट पीक विमा हप्त्याच्या पावत्या, शेतकऱ्यांची फसवणूक,  चार लाख लुटले

Sangamner Crime News: पीक विमा हप्त्याची रक्कम घेऊन बनावट हप्त्याच्या पावत्या देऊन शेतकऱ्यांची फसवणूक, चार लाख रुपयांची फसवणूक (Cheating). 

Fake crop insurance premium receipts, cheating farmers

संगमनेर: शेतकऱ्यांकडून पीक विमा हप्त्याची रक्कम घेऊन त्यांना बनावट पीक विमा हप्त्याच्या पावत्या देणाऱ्या आपले सरकार ई महासेवा केंद्र मालक आणि चालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

संगमनेर तालुका कृषी अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चार लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

प्रसन्ना गोरे (मालक आपले सरकार ई महासेवा केंद्र, पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही), प्रवीण सुधाकर ताजणे (चालक आपले सरकार ई महासेवा केंद्र, रा. ढोलेवाडी, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Fake crop insurance premium receipts, cheating farmers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here