Home क्राईम संगमनेर शहरात मुलीचा विनयभंग, तिघांना मारहाण

संगमनेर शहरात मुलीचा विनयभंग, तिघांना मारहाण

Sangamner Crime: मुलीचा विनयभंग (Molestation) आणि तिघा जणांना माराहणं, गुन्हा दाखल.

Girl molestation, three beaten up in Sangamner city

संगमनेर: अकोले नाका परिसरात शनिवारी (दि. १६) रात्री दहाच्या सुमारास तिघांना मारहाण करत एका मुलीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात मारहाण झालेल्या ४७ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून १८ दिली. जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यात काही महिला तसेच अल्पवयीन असलेल्यांचा देखील समावेश आहे.

जया सूर्यवंशी, मथुरा सुर्यवंशी, पूनम माळी, इंदुबाई सूर्यवंशी, परिघा सूर्यवंशी (सर्व रा. अकोले नाका, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

मारहाण झालेली फिर्यादी महिला कुटुंबातील सदस्यांसोबत शहरानजीक असलेल्या गोल्डन सिटी परिसरात भाडोत्री राहण्यास गेली होती. तेथील खोली खाली करून पुन्हा अकोले नाका येथील घरी राहण्यास आल्याने गुन्हे  दाखल झालेल्या १८ जणांनी फिर्याद महिला आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना काठ्या, लोखंडी रॉडने मारहाण केली. तुम्ही येथे राहिल्यास जाळून टाकू अशी धमकीह घरातील टीव्ही, फर्निचर व इत सामानाची तोडफोड करत सीसीटीव्ह कॅमेऱ्याचे नुकसान केले.  फिर्यादी  महिला आणि तिच्या कुटुंबातील दुसऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचं दागिने ओढून नेले. या गुन्ह्यात समावेश  असलेल्या चौघांनी फिर्यादी महिलेच्या पुतणीचा विनयभंग केला. असे फिर्यादीत नमूद आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंदरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाल पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Girl molestation, three beaten up in Sangamner city

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here