Home अकोले भंडारदरा परिसरात कार बुडालेल्या घटनेतील तिसरा मृतदेह सापडला

भंडारदरा परिसरात कार बुडालेल्या घटनेतील तिसरा मृतदेह सापडला

Rajur: Third Dead body found – तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी (दि. १७) वाकी शिवारातील नदीपात्रात सकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान तिसरा मृतदेह सापडला.

Third Dead body found in a car drowning incident in Bhandardara 

राजूर: अकोले तालुक्यातील वारंघुशी फाट्याच्या पुढील वळणाजवळून वाहत असलेल्या कृष्णावंतीच्या पात्रात शुक्रवारी (दि. १५) रात्री वाहून गेलेल्या नाशिक येथील तुकाराम  रामदास सांगरे (वय ७०) यांचा मृतदेह  तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी (दि. १७) वाकी शिवारातील नदीपात्रात सकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान सापडला.

शुक्रवारी रात्री औरंगाबाद येथील दोन पर्यटक कारसह कृष्णावंती नदीच्या पाण्यात बुडाले होते. त्याचदिवशी अपघातग्रस्त  ठिकाणाजवळ लघुशंकेसाठी सांगरे  त्यांच्या गाडीतून उतरले होते. त्याठिकाणी पाय घसरल्याने ते नदीत  पडले आणि वाहून गेले होते.  तेव्हापासून राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे आपल्या कर्मचान्यांसमवेत त्या बेपत्ता व्यक्तीचा शोध घेत होते. शनिवारी पोलिसांबरोबर वन्यजीव, महसूल विभागाचे कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ त्यांचा शोध घेत होते. पावसामुळे शोध कामात अडथळा येत असला तरी पाऊस उघडताच पथकाने शोधकार्य पुन्हा हाती घेतले होते. अखेर तिसऱ्या  दिवशी रविवारी सकाळी वाकी शिवारात नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात  आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Third Dead body found in a car drowning incident in Bhandardara 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here