Home पुणे प्रेमासाठी स्वतः च्या खुनाचा बनाव, दुसऱ्याला स्वतःचे कपडे घालून रोटरमशीनमध्ये चिरडले

प्रेमासाठी स्वतः च्या खुनाचा बनाव, दुसऱ्याला स्वतःचे कपडे घालून रोटरमशीनमध्ये चिरडले

Murder Case: स्वतःचे कपडे घालून मृतदेह ट्रॅक्टरला जोडलेल्या रोटरमशीनमध्ये फिरवून निर्घृण खून केल्याची घटना. प्रेयसीसोबत दूर कोठे तरी जाऊन रहायचे होते. यासाठी त्याच्याच मृत्यूचा बनाव.

Faking one's own murder  Another was crushed in a rotor machine wearing his own clothes

पुणे | आळंदी : स्वतःच्या खुनाचा बनाव करण्यासाठी एका नराधमाने दुसऱ्या व्यक्तीचे शीर थडा वेगळे करत तसेच स्वतःचे कपडे घालून मृतदेह ट्रॅक्टरला जोडलेल्या रोटरमशीनमध्ये फिरवून निर्घृण खून केला. संबंधित घटना च-होली खुर्द (ता. खेड) हद्दीत १६ डिसेंबरला घडली असून नुकताच खुनाचा उलगडा झाला •आहे. सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे ( वय ६५ रा. चन्होली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर रविंद्र भिमाजी घेनंद (वय ४८) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी निखील रविंद्र घेनंद (वय २८ रा. धानोरे, खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  आरोपी याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्याला त्याच्या प्रेयसीसोबत दूर कोठे तरी जाऊन रहायचे होते. यासाठी त्याला त्याच्याच मृत्यूचा बनाव बनवायचा होता. म्हणून त्याने संबंधित महिलेसोबत मिळून रविंद्र घेनंद यांना विश्वासात घेऊन सुभाष ज्ञानोबा थोरवे यांच्या शेतात बोलावले. कोयत्याने त्यांचे मुंडके कापले, मृतदेहाच्या अंगावर स्वतःचे कपडे घातले. तसेच शेतात काम करावयाच्या ट्रॅक्टरला जोडलेल्या रोटर मशीनमध्ये मृतदेह घालून तो फिरवला. त्यानंतर हा अपघात असल्याचा बनाव केला.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

तसेच मृतदेहाचे मुंडके, कोयता, व अंगावरचे कपडे लपवून ठेवत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र या साऱ्या प्रकरणात शंका घेण्यासारखे अनेक मुद्दे असल्याने आरोपीचे पितळ उघडे पाडत त्याला अटक केल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गोडसे यांनी दिली.

Web Title: Faking one’s own murder  Another was crushed in a rotor machine wearing his own clothes

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here