Home अकोले अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत उपसरपंच निवड या दिवशी होणार

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत उपसरपंच निवड या दिवशी होणार

Ahmednagar Gram panchayat election:  ग्रामपंचायत उपसरपंच निवड 29 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान चार दिवस ही प्रक्रिया राबविली जाणार.

Gram Panchayat Upsarpanch election in Ahmednagar

अहमदनगर:  राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक पार पडली आहे. आता या ग्रामपंचायतींची पहिली सभा उपसरपंच निवडीसाठी होणार आहे. येत्या 29 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान चार दिवस ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. या निवड प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी वर्ग दोनच्या अधिकारी नियुक्त्यांचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढला आहे. दरम्यान, उपसरपंचपदी आपलीच निवड व्हावी यासाठी गावोगावी इच्छुकांनी फिल्डींग लावली आहे.

28 रोजी उपसरपंचाची निवड होणार्‍या ग्रामपंचायतींमध्ये –

हिंगोणी, गोधेगाव, हंडीनिमगाव, माका, वडाळा बहिरोबा, कांगोणी, चिंचबन, माळीचिंचोरा, शिरेगाव, खुपटी, सुरेशनगर (नेवासे). राजुरी, शिऊर (जामखेड). नांदुर्खी बुद्रुक आणि खुर्द, खडकेवाके, साकोरी, डोर्‍हाळे, राजुरी, आडगाव खुर्द, लोहगाव, रांजणखोल (राहाता). भालगाव, वडगाव, कोळसांगवी, सोनोशी, कोरडगाव, जिरेवाडी, निवडुंगे, मोहरी, वैजूबाभूळगाव, तिसगाव, कोल्हार (पाथर्डी). निंबे, आळसुंदे, मुळेवाडी, कौंडाणे, बहिरोबाची वाडी, कापरेवाडी, कोपर्डी, म्हाळंगी (कर्जत). सोनेवाडी (चास), पिंपळगाव कौंडा, कापूरवाडी, आगडगाव, पांगरमल, मदडगाव, टाकळी खातगाव, सोनेवाडी (पिला), शेंडी, सारोळा कासार, साकत, नारायणडोह, कौडगाव जांब, जखणगाव (नगर). आरडगाव, केंदळ खुर्द, सोनगाव, तुळापूर, कोल्हार खुर्द, खडांबे खुर्द, कोंढवड, मांजरी, ब्राम्हणगाव भांड, मानोरी (राहुरी). वांगी खुर्द व बुद्रुक, खंडाळा, उंबरगाव, माळेवाडी, कमलापूर (श्रीरामपूर). भोजडे, सडे, शिंगणापूर, वेस सोयगाव, कोळपेवाडी, वडगाव, मोर्वीस, खिर्डीगणेश, पढेगाव, चासनळी, माहेगाव देशमुख, रांजणगाव देशमुख, शहापूर (कोपरगाव). खानापूर, आखेगाव, अमरापूर, जोहरापूर, रांजणी, भायगाव, खामगाव, दहिगावने, सुलतानपूर खुर्द, कुरुडगाव (रावतळे), वाघोली, प्रभू वडगाव (शेवगाव). निंबाळे, धांदरफळ खुर्द, जांबूत बुद्रुक, चिकणी, कोळवाडे, निमगाव भोजापूर, कर्जुले पठार, मालुंजे, निमगाव जाळी, हंगेवाडी, रणखांब, निळवंडे, सादतपूर, दरेवाडी, घुलेवाडी, करुले, रहिमपूर, धांदरफळ बुद्रुक (संगमनेर). भाळवणी, पळशी, पाडळी तर्फे कान्हूर, कोहकडी, गोरेगाव, चोंभूत, म्हस्केवाडी, सिद्धेश्वरवाडी, हत्तलखिंड, करंदी, पिंपळगाव तुर्क, वनकुटे, भोंद्रे, पुणेवाडी, गणोरे, ढवळपुरी (पारनेर). अंभोळ, भंडारदरा, चास, डोंगरगाव, गुहिरे, लहित खुर्द, मुरशेत, शेंडी, शिळवंडी, सोमलवाडी, वाकी (अकोले). माठ, थिटे सांगवी, बनपिंपरी, तरडगव्हाण, घोगरगाव, चवर सांगवी, पारगाव सुद्रिक, काष्टी, बेलवंडी बुद्रुक, तांदळी दुमाला (श्रीगोंदे).

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

30 डिसेंबर निवडी होणार्‍या ग्रामपंचायती –

अंमळनेर (नेवासे), न.पा.वाडी, सावळी विहीर बुद्रुक (राहाता), वाळकी, उक्कडगाव, सारोळा बद्दी, रांजणी, नेप्ती, खातगाव टाकळी, वडगाव तांदळी, नांदगाव (नगर). ताहराबाद (राहुरी), बहादराबाद, डाऊच बुद्रुक व खुर्द, देर्डे कोर्‍हाळे, हांडेवाडी, बक्तरपूर, करंजी बुद्रुक, चासनळी, बहादरपूर (कोपरगाव). कनकापूर, वडझरी खुर्द, ओझर खुर्द, डोळासणे, पोखरी हवेली, सायखिंडी, चिंचोली गुरव, पिंपरणे, वडझरी बुद्रुक, जोर्वे, कोल्हेवाडी, उंबरी बाळापूर, तळेगाव दिघे, निमोण, अंभोरे (संगमनेर).

31 डिसेंबर निवडी होणार्‍या ग्रामपंचायती:  रत्नापूर (जामखेड), भेंडे खुर्द (नेवासे), निघोज (राहाता), बाबुर्डी बेंद, दहिगाव, आठवड, राळेगण, पिंपळगाव लांडगा (नगर). तळेगाव मळे, चांदे कसारे, धारणगाव, सोनेवाडी, खोपडी (कोपरगाव).

1 जानेवारी निवडी होणार्‍या ग्रामपंचायती: वाघापूर, खराडी, साकूर, जांभूळवाडी (संगमनेर).

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 28 (1) नुसार मावळत्या सदस्यांचा कार्यकाळ समाप्त झाल्याच्या लगतच्या दिवसापेक्षा उशीर होणार नाही, अशा दिवशी सरपंच व उपसरपंच यांच्या निवडणुकीची पहिली सभा घेण्याची तरतूद आहे.त्यानूसार या निवडी होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: Gram Panchayat Upsarpanch election in Ahmednagar

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here