Home अहमदनगर विजेच्या धक्क्याने प्रसिद्ध न्युरो सर्जन डॉक्टरचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने प्रसिद्ध न्युरो सर्जन डॉक्टरचा मृत्यू

Rahata News: विजेचा धक्का (electric shock) बसून शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयाचे सेवानिवृत्त प्रसिध्द न्युरो सर्जन डॉ. काशिनाथ टिंगरे (वय 66) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना.

Famous neurosurgeon doctor died due to electric shock

राहता: तळघरात पाणी काढण्यासाठी विजेची मोटार जोडत असताना विजेचा धक्का बसून शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयाचे सेवानिवृत्त प्रसिध्द न्युरो सर्जन डॉ. काशिनाथ टिंगरे (वय 66) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

डॉ. टिंगरे हे साईबाबा रुग्णालयातून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते साकुरी येथे राहत होते. ते एकटेच राहत होते. त्यांच्या जेवणाचा डबा घेऊन त्यांच्या घरी बाबासाहेब भाऊसाहेब बावके हे गेले असता ते घरात दिसले नाहीत. म्हणून बावके यांनी तळघरात डॉक्टरांना पाहण्यासाठी गेले असता, एक इलेक्ट्रिक मोटार व वायरिंग व तळघरात दोन फूट उंच पाणी साचलेले दिसले.

पाण्यात पाहिले असता त्यांना डॉ. टिंगरे हे पाण्यात पडल्याचे दिसून आले. त्यांच्या एका हातामध्ये वायर दिसून आली. त्यांच्या डावे हाताचे अंगठ्याजवळ दोन बोटाला जखम झाल्याचे दिसून आले. बावके यांनी त्यांना हाक मारली. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे डॉ. टिंगरे मयत झाल्याची बावके यांना खात्री झाल्याने त्यांनी राहाता पोलीस ठाण्यात या प्रकाराची खबर दिली.

राहाता पोलिसांनी अकस्मात मृत्यू 63/ 2022 सीआरपीसी 174 प्रमाणे नोंद केली आहे. या घटनेचा अधिक तपास राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आवारे करत आहेत.

Web Title: Famous neurosurgeon doctor died due to electric shock

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here