Home राष्ट्रीय प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या, सरकारने कालच सुरक्षा...

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या, सरकारने कालच सुरक्षा हटवली अन Firing

Famous Punjabi singer Sidhu Musewala Firing shot dead

चंदिगढ: प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Famous Punjabi singer Sidhu Musewala ) यांची आज गोळ्या (Firin) घालून हत्या (murder) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.  सिद्धू मुसेवाला यांच्यावर मनसा येथील जवाहरके गावाजवळ गोळीबार झाला होता. यानंतर सिद्धू मुसेवाला यांना मनसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात त्यांच्यासोबत अन्य दोन जणही जखमी झाले आहेत.

सिद्धू मुसेवाला यांना धमक्या मिळत होत्या. पंजाबमधील आम आदमी सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत एक दिवसापूर्वीच व्हिआयपी सुरक्षा मागे घेण्यात आली होती. मुसेवाला याने पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार विजय सिंगला यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.

त्याने कॉलेजच्या दिवसांमध्ये संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर तो कॅनडाला होता. मुसेवाला वादग्रस्त पंजाबी गायकांपैकी एक होता. तो खुलेआम बंदूक संस्कृतीला प्रोत्साहन देत होता.  

Web Title: Famous Punjabi singer Sidhu Musewala Firing shot dead

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here