Home नागपूर धक्कादायक घटना! पोलीस कर्मचाऱ्याचा विधवा महिलेवर बलात्कार -Rape

धक्कादायक घटना! पोलीस कर्मचाऱ्याचा विधवा महिलेवर बलात्कार -Rape

Nagpur Crime Police officer rape widow

नागपूर | Nagpur Crime: नागपूर पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर शहर पोलीस दलात वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने एका विधवा महिलेवर बलात्कार (rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच तक्रार दाखल केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.

हेमंत कुमरे असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पोलीस कर्मचारी पसार झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  हेमंत कुमरे हा विवाहित आहे. पत्नी आणि मुलांसह पोलीस लाईन टाकळी परीसरात वास्तव्यास आहे. २०१२ मध्ये पीडित महिलेच्या भावाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी जरीपटक्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी हेमंत कुमरेशी महिलेशी ओळख झाली होती. हेमंतने महिलेचा मोबाईल नंबर घेतला आणि त्यांच्यात संपर्क वाढला. याचदरम्यान महिलेच्या पतीचा मृत्यू झाला.

महिला एका मुलीसह राहत होती. त्यामुळे सहानुभूती देण्यासाठी हेमंत महिलेच्या घरी गेला. त्यानंतर मदत करण्याच्या बहाण्याने हेमंतचे तिच्या घरी येणे-जाणे होते. विधवा झालेल्या महिलेने पोटापाण्यासाठी नारी रोडवर ब्युटीपार्लर उघडले होते. हेमंतची वाईट नजर या महिलेवर होती. तिला अविवाहित असल्याचे खोटे सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. २०१५ पासून दोघांचे प्रेमसंबंध होते. त्याने तिला लग्न करण्याचे आमिष दाखविले. त्यामुळे महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवला.

हेमंतने महिलेला भाड्याने खोली घेऊन दिली. तो रात्रीच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत घरी येत होता. महिलेवर बळजबरी करीत शारीरिक संबंध (Sex) प्रस्थापित करीत होता. गेल्या काही दिवसांपासून तो तिला मारझोड करायला लागला. तिने लग्न करण्याची वारंवार मागणी केल्याने त्याने नकार देत जीवे मारण्याची धमकी दिली. तिने जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Web Title: Nagpur Crime Police officer rape widow

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here